
-स्पर्धेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर
बीड, 9 डिसेंबर (हिं.स.)। राज्यात रब्बी हंगाम २०२५ साठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई आणि जवस या पाच पिकांसाठी पीकस्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवर होईल. शेतकऱ्यांनी नवे प्रयोग करून उत्पादन वाढवावे, यासाठी शासनाने ही योजना सुरू केली आहे. प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन इत शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळावी, हा उद्देश आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्याच्या नावावर जमीन असावी आणि ती तो स्वतः कसत असावा. एका शेतकऱ्याला एकापेक्षा जास्त पिकांसाठी अर्ज करता येईल. मात्र, प्रत्येक पिकासाठी किमान ४० आर क्षेत्र सलग लागवडीत असणे आवश्यक आहे. स्पर्धेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर आहे. अर्जासोबत विहित नमुन्यातील अर्ज, प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, ७/१२, ८-अ उतारा, जात प्रमाणपत्र (आदिवासी गटासाठी), चिन्हांकित नकाशा आणि बैंक खात्याची खात्याची छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी एस.एम. साळवे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा www.krishi.maharasht ra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रवेश शुल्क सर्वसाधारण गटासाठी ३०० रुपये आणि आदिवासी गटासाठी १५० रुपये आहे. तालुका पातळीवर प्रथम क्रमांकासाठी ५ हजार, दुसऱ्यासाठी ३ हजार आणि तिसऱ्यासाठी २ हजार रुपये बक्षीस दिले जाईल. जिल्हा पातळीवर अनुक्रमे १० हजार, ७ हजार आणि ५ हजार रुपये मिळतील. राज्य पातळीवर प्रथम क्रमांकासाठी ५० हजार, दुसऱ्यासाठी ४० हजार आणि तिसऱ्यासाठी ३० हजार रुपये बक्षीस दिले जाईल.
--------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis