
बीड, 9 डिसेंबर, (हिं.स.)। लातूर येथे पार पडलेल्या ३५ व्या महाराष्ट्र राज्य सिनिअर क्योरोगी तायक्वांदो स्पर्धेत बीडच्या नयन अविनाश बारगजे हिने ४९ किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावले. या हैदराबाद येथे १२ ते १५ डिसेंबरदरम्यान होणाऱ्या ४१ व्या राष्ट्रीय सिनिअर क्योरोगी व पूमसे तायक्वांदो स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात स्थान मिळाले आहे.
नयन बारगजेचे राज्यस्तरावरील हे दहावे सुवर्णपदक आहे. तीने आतापर्यंत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, शालेय स्पर्धा, फेडरेशन, ओपन स्पर्धा आणि अखिल भारतीय विद्यापीठाच्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके जिंकली आहेत. ती डॉ. अविनाश बारगजे आणि जया बारगजे यांची कन्या असून, प्रविण सोनकुल यांचे मार्गदर्शन तिला लाभले. या स्पर्धेत राज्यातील २८ जिल्ह्यांतील ३२० खेळाडूंनी सहभाग घेतला. पुणे, ठाणे, जळगाव, रायगड, रत्नागिरी आणि बीड जिल्ह्यांच्या खेळाडूंनी वर्चस्व राखले. बीडच्या ओंकार परदेशी याने रौप्यपदक, तर देवेंद्र जोशी याने कांस्यपदक पटकावले. ऋत्विक तांदळे, सुमित राऊत, सागर केळगंद्रे आणि प्रतिक कांबळे यांनीही चांगली कामगिरी केली. क्योरोगी प्रकारात जळगावच्या निकीता पवार आणि पुण्याच्या कानिफनाथ पोकळे यांना, तर पूमसे प्रकारात ठाण्याच्या वंश ठाकूर आणि मृणाली हर्नेकर यांना सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार देण्यात आला.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis