नाट्य कलावंतांचे यश परभणीकरांसाठी अभिमानास्पद - भगवान वाघमारे
परभणी, 9 डिसेंबर, (हिं.स.)। नांदेड येथे झालेल्या राज्यस्तरीय हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेत परभणीच्या कलावंतांनी उत्तुंग भरारी घेतली असून प्रथम क्रमांकासह 15 पारितोषिक मिळविले आहेत परभणीतील नाट्य कलावंतांची ही कामगिरी परभणीकरांसाठी अभिमानास्पद गोष
नाट्य कलावंतांचे यश परभणीकरांसाठी अभिमानास्पद  भगवान वाघमारे यांचे प्रतिपादन ;  नाट्य कलावंतांचा सत्कार


परभणी, 9 डिसेंबर, (हिं.स.)। नांदेड येथे झालेल्या राज्यस्तरीय हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेत परभणीच्या कलावंतांनी उत्तुंग भरारी घेतली असून प्रथम क्रमांकासह 15 पारितोषिक मिळविले आहेत परभणीतील नाट्य कलावंतांची ही कामगिरी परभणीकरांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे असे प्रतिपादन माजी उपमहापौर भगवान वाघमारे यांनी केले.

परभणी येथे नाट्य कलावंतांच्या सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते बेलेश्वर नागरी पतसंस्थेच्या वतीने परभणीतील यशस्वी नाट्य कलावंतांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी माजी उपमहापौर भगवान वाघमारे, काँग्रेस तालुकाध्यक्ष पंजाबराव देशमुख, माजी सभापती गुलमीर खान पठाण, जेष्ठ नाट्यकर्मी विजय करभाजन, नाट्य कलाकार किशोर पुराणिक, राजू काजे , उपेंद्र दुधगावकर, डॉ. अर्चना चिक्षे, राजकुमार जाधव आदींची उपस्थिती होती.

याबरोबर गुलमीर खान पठाण, पंजाबराव देशमुख यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले यावेळी बोलताना वाघमारे म्हणाले की नाट्य कलावंतांची ही चळवळ जोमाने सुरू आहे आम्ही सर्व कलावंताच्या पाठीशी असून लवकरच रंगमंदिराचा प्रश्न निकाली लागू अथवा जुने रंगांमधील चालू करण्याच्या संदर्भात काहीतरी हालचाली करू असेही आश्वासन दिले.

याप्रसंगी राजीव गांधी युवा फोरम या संस्थेच्या संपूर्ण या नाटकाला प्रथम पारितोषिक मिळाले निर्माते संजय पांडे, लेखक व दिग्दर्शक विजय करभाजनअभिनयाचे प्रथम पारितोषिक विजेते किशोर पुराणिक, डॉ. अर्चना चिक्षे यांच्यासह सर्व तंत्रज्ञ व कलावंतांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर इतरही नाटकातील विजेत्या कलावंतांचा सत्कार करण्यात आला यामध्ये मधुकर उमरीकर, सुनंदा कुलकर्णी ,डिघोळकर ,त्र्यंबक वडसकर, प्रसाद देशपांडे, रेवती पांडे, सई चिटणीस, भाग्यश्री गायकवाड, अतुल साळवे, प्रकाश बारबिंड, रेणुका अंबेकर,अनिकेत शेंडे, प्रेम शिंदे, राजाभाऊ चव्हाण, शिवाजी सुक्ते, श्रीकांत कुलकर्णी, अनिल पांडे,बंडु जोशी. आदींची उपस्थिती होती.

यावेळी सर्व कलावंतांना पुष्पहार व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विष्णू वाघमारे, गणेश वाघमारे, बेलेश्वर पतसंस्थेचे व्यवस्थापक राजु बरगले आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande