“प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका” — मुख्यमंत्री
नागपूर, 09 डिसेंबर (हिं.स.) : राज्यातील लोकप्रिय ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत सुरू असलेल्या चर्चा आणि टीकेचा उल्लेख करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात स्पष्ट शब्दांत इशारा दिला.“प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका. या योजनेची तुलना कोणत्याही
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री


नागपूर, 09 डिसेंबर (हिं.स.) : राज्यातील लोकप्रिय ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत सुरू असलेल्या चर्चा आणि टीकेचा उल्लेख करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात स्पष्ट शब्दांत इशारा दिला.“प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका. या योजनेची तुलना कोणत्याही इतर योजनेशी करता येणार नाही. योजनेला सतत विरोध केल्यास घरी बसावे लागेल,” असे कठोर विधान त्यांनी सदस्यांना उद्देशून केले.

विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात काही सदस्यांनी इतर मुद्द्यांच्या तुलनेत ‘लाडकी बहीण’ योजनेला प्राधान्य दिले जात असल्याचे म्हटले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली.आमदार ज्योती गायकवाड यांनी महिलांच्या सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित करत,“योजनेतील 1500 रुपयांपेक्षा महिला सुरक्षा अधिक महत्त्वाची,” असे वक्तव्य केले.यावर मुख्यमंत्री म्हणाले की,महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर संपूर्ण आणि पारदर्शक चौकशी सुरू आहे. काही जण प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. राजकारण करून एखाद्याला लक्ष्य करणे योग्य नाही.तसेच, त्यांनी स्पष्ट केले की,“राज्यातील अडीच कोटी बहिणींनी ही योजना स्वीकारली आहे. त्यामुळे योजना सुरू राहणार आहे आणि त्याचबरोबर महिला सुरक्षेलाही पूर्ण प्राधान्य दिले जाणार आहे.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande