छत्रपती संभाजीनगर येथे बुधवारी 'रोजगार मेळावा
छत्रपती संभाजीनगर, 9 डिसेंबर (हिं.स.)। कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत आयोजित ‘जागेवर निवड संधी’ रोजगार मेळावा बुधवार दि.१० रोजी सकाळी १० ते दु.२ या वेळेत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्
छत्रपती संभाजीनगर येथे बुधवारी 'रोजगार मेळावा


छत्रपती संभाजीनगर, 9 डिसेंबर (हिं.स.)। कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत आयोजित ‘जागेवर निवड संधी’ रोजगार मेळावा बुधवार दि.१० रोजी सकाळी १० ते दु.२ या वेळेत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती बसस्टँड रोड, मालजीपुरा, छत्रपती कौशल्य विकास राजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी सुरेश बहुरे यांनी केले आहे.

या रोजगार मेळाव्यात छत्रपती संभाजीनगर व पुणे जिल्ह्यातील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत. डिस्टील एज्युकेशन अ‍ॅड टेक्नॉलॉजी प्रा. लि., एल. आय. सी. ऑफ इंडिया, चैतन्य इंडिया फिन क्रेडीट प्रा. लि. यांसारख्या प्रतिष्ठित नियोक्त्यांकडून एकूण सुमारे १६० रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे.

मेळाव्यासाठी डिप्लोमा (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स), आयटीआय (सर्व ट्रेड), एचएससी, एसएससी उत्तीर्ण उमेदवार पात्र असून विविध शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेनुसार रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत.

इच्छुक उमेदवारांनी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध रिक्त पदांसाठी युजर आयडी आणि पासवर्डच्या सहाय्याने ऑनलाईन अर्ज करावा. तसेच ज्यांना ऑनलाईन अर्ज करणे शक्य नसल्यास बायोडाटाच्या ५ प्रती घेऊन प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहता येईल. नोंदणी किंवा अर्ज करताना काही अडचण आल्यास उमेदवारांनी कार्यालयीन वेळेत 0240-2954859 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.छत्रपती संभाजीनगर यांनी पात्र उमेदवारांनी १० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता वेळेवर उपस्थित राहून रोजगार संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande