
नाशिक, 9 डिसेंबर (हिं.स.)। साधू ग्राम येथे झाडं तोडल्यानंतर दुसरीकडे झाडे लावण्यासाठी महानगरपालिका प्रयत्न करत असताना आता त्या ठिकाणी नागरिकांचा विरोध होत असल्याची माहिती समोर आली आहे याबाबत महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी गंभीर दखल घेतली असून नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
नासिक मध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर ती साधू ग्राम मध्ये झाड तोडण्याचा विषय हा वादग्रस्त ठरत आहे या सर्व प्रश्नावरती सोमवारी मनपा युक्त मनीषा खत्री आणि पर्यावरण प्रेमी नागरीक यांची बैठक झाली या बैठकीमध्ये महानगरपालिकेने स्पष्ट भूमिका घेऊन साधू ग्राम जर करावयाचा असेल तर काही प्रमाणामध्ये वृक्षतोड करावी लागेल अशी भूमिका घेतली या बदलांमध्ये अन्य ठिकाणी झाड लावण्यात येत असल्याचे सांगितले हे सर्व सुरू असताना आता एक नवीन वाद उभा राहिलेला आहे.
महानगरपालिकेच्या वतीने वृक्षतोड केल्यानंतर नव्याने झाडे लावण्यात येत असल्याचे सांगितले जात आहेत त्या दृष्टिकोनातून कामदेखील सुरू झाल्याचे सांगितले आहे असाच एक प्रकार सध्या सुरू आहे नाशिक रोड परिसरामध्ये एका उद्यानात झाडे लावण्यासाठी महानगरपालिकेच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असताना या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी तपोवन मध्ये सुरू असलेल्या वादाचे संदर्भ देऊन या ठिकाणी नवीन झाडे लावू नये असे सांगितलेले आहे तरी देखील महानगरपालिकेच्या वतीने या उद्यानात दोन-तीन झाडांची लागवड करण्यात आलेली होती परंतु येथे स्थानिक नागरिकांनी महानगरपालिकेच्या या वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी म्हणून जी लागवड केली होती ती लागवड देखील तोडून जी झाडे लावली होती ती उपटून फेकून दिलेली आहे असा प्रकार समोर आला आहे याबाबत आता महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी या घटनेला स्वतः दुजोरा दिलेला आहे. त्यामुळे आता शहरांमध्ये तपोवन सुरू असलेल्या वृक्षतोडीला होत असलेल्या विरोधाचे तीव्र पडसाद पडत असून शहरात अन्य भागामध्ये नागरिकांकडूनच नवीन वृक्ष लागवड करण्यासाठी विरोध होत असल्याचे समोर आलेले आहे.
नागरिकांनी तपोवनमध्ये सुरू असलेल्या वृक्षतोडीला जो विरोध होत आहे त्याचे पडसाद शहरात पडत असल्याचे समोर आलेले आहे त्यामुळेच आता नवीन वृक्ष लागवड कुठे करावी हा प्रश्न महानगरपालिकेसमोर आहे त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहे पण वृक्ष प्रेमी नागरिकांनी आता यावर काय करावे हे स्वतःहून सांगितलं तर चांगलं राहील
मनीषा खत्री आयुक्त मनपा
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV