
नाशिक, 9 डिसेंबर (हिं.स.)। माणिक कोकाटे यांच्या व्हिडिओ प्रकरणांमध्ये नाशिक न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यामध्ये बाजू मांडण्यासाठी म्हणून शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना 16 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये शेवटच्या दिवशी विधिमंडळामध्ये ऑनलाइन रमी खेळत असताना राज्याचे विद्यमान क्रीडामंत्री आणि त्या वेळचे कृषी मंत्री माणिक कोकाटे यांचा एक व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रसारित केला होता या सर्व प्रकरणांमध्ये कोकाटे यांच्यावरती मोठ्या प्रमाणावर टीकाही झाली होती. त्यानंतर कोकाटे यांनी नाशिकच्या न्यायालयात आमदार रोहित पवार यांच्या विरोधामध्ये याचिका दाखल केलेली आहे. ही याचिका दाखल झाल्यानंतर नाशिक न्यायालयाने मुंबई पोलिसांना एक पत्र पाठवून याबाबतचा अहवाल मागितला होता मागील महिन्यामध्ये हा अहवाल मुंबई पोलिसांनी नाशिकच्या न्यायालयात सादर केल्यानंतर न्यायालयाकडून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांना न्यायालयात हजर होण्याचे आदेश दिलेले होते.
या याचिकेवरती न्यायालयाने शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांना आपली बाजू मांडण्यासाठी म्हणून नऊ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिलेले होते या दरम्यानच नागपूर येथे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे त्या ठिकाणी आमदार रोहित पवार हे उपस्थित आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या वकिलामार्फत अर्ज करून नाशिक न्यायालयातून मुदतवाढ मागितली होती ही मुदतवाढ नासिक न्यायालयाने दिली असून पुढील मंगळवारी म्हणजे 16 डिसेंबर रोजी न्यायालयामध्ये बाजू मांडण्यासाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV