अमरावती : मौजे अकोलीत क्रीडा संकुल उभारणीसाठी ३० कोटींची मागणी; तुषार भारतीयांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
अमरावती, 9 डिसेंबर (हिं.स.) फिट इंडिया मोहिमेच्या प्रेरणेने अमरावती शहरात क्रीडासुविधा वाढविण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. साईनगर प्रभागातील महाराष्ट्र गृहनिर्माण संस्थेकडून महानगरपालिकेला हस्तांतरित झालेल्या मौजे अकोली सर्वे क्रमांक
अकोलीत क्रीडा संकुल उभारणीसाठी ३० कोटींची मागणी; तुषार भारतीयांचे मुख्यमंत्र्यांना पत्र


अमरावती, 9 डिसेंबर (हिं.स.)

फिट इंडिया मोहिमेच्या प्रेरणेने अमरावती शहरात क्रीडासुविधा वाढविण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. साईनगर प्रभागातील महाराष्ट्र गृहनिर्माण संस्थेकडून महानगरपालिकेला हस्तांतरित झालेल्या मौजे अकोली सर्वे क्रमांक ७ मधील ४.०७ हेक्टर विस्तीर्ण मैदानावर अत्याधुनिक क्रीडा संकुल उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

या संदर्भात तुषार भारतीय यांनी थेट मुख्यमंत्री यांना पत्र पाठवून ३० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याची विनंती केली आहे. त्यांनी नमूद केले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फिट इंडिया संकल्पनेतून प्रेरणा घेऊन नागरिकांमध्ये आरोग्यजागर निर्माण करणे, सामाजिक ऐक्य दृढ करणे आणि खेळांच्या माध्यमातून सक्षम, निरोगी व सबल भारत घडविणे आवश्यक आहे. अमरावती शहरातील मोठ्या प्रमाणावरील तरुणाईसाठी अशी क्रीडासुविधा अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.प्रस्तावित प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवरील क्रीडा कौशल्य वाढीस लागून विविध क्रीडा स्पर्धांना चालना मिळेल, असेही मत व्यक्त करण्यात आले आहे. त्यामुळे मौजे अकोली सर्वे क्र. ७ येथील मैदान विकासासाठी तातडीने निधी मंजूर करावा, अशी मागणी आता वेगाने पुढे येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande