मुलींना 'गुड टच-बॅड टच'ची जाणीव होणे आवश्यकच : प्रा.सुषमा माने
बीड, 9 डिसेंबर, (हिं.स.)। कौटुंबिक व शाळा, महाविद्यालय व सार्वजनिक ठिकाणी वावरत असताना मुलींना गुड टच बॅड ची जाणीव होणे आवश्यकच आहे. मणिपुर, कोलकाता, सातारा, बदनापूर, मालेगाव, माजलगावसारख्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी विद्याथ्यांना सजग करणं
मुलींना 'गुड टच-बॅड टच'ची जाणीव होणे आवश्यकच : प्रा.सुषमा माने


बीड, 9 डिसेंबर, (हिं.स.)। कौटुंबिक व शाळा, महाविद्यालय व सार्वजनिक ठिकाणी वावरत असताना मुलींना गुड टच बॅड ची जाणीव होणे आवश्यकच आहे. मणिपुर, कोलकाता, सातारा, बदनापूर, मालेगाव, माजलगावसारख्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी विद्याथ्यांना सजग करणं गरजेचं आहे. काही अनुचित प्रकार घडल्यास मुलींनी आई-वडिलांना किंवा शिक्षकांना सांगावं, असे आवाहन प्रा. सुषमा माने यांनी केले.

दिंदुड येथील केंद्रीय शाळेत लिंगभेद हिंसाचार विरोधी उपक्रमांतर्गत समुपदेशन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी त्या बोलत होत्या.

दिंद्रुड येथील जिल्हा परिषद शाळेत सिरसाळा येथील पंडितगुरु पार्डीकर महाविद्यालय आणि पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लिंगभेद हिंसाचार विरोध उपक्रमांतर्गत समुपदेशन पंधरवाडा निमित्त कार्यक्रम घेण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थीनींना मार्गदर्शन करताना प्रा. सुषमा माने बोलत होत्या. प्रा. डॉ. उषा माने, प्रा. सुषमा माने, पोलीस हवालदार गणपती बुचाले, ईश्वर गंगावणे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दादासाहेब वकरे, द्रोपदी कटारे, मुख्याध्यापक मंचक सोळंके यावेळी उपस्थित होते.

शाळकरी मुलींना त्यांच्या शरीराला होणाऱ्या स्पर्शामागची भावना समजणं गरजेचं आहे. याचाही त्यांनी उल्लेख केला.माझं शरीर, माझा हक्क, 'आपला आवाज, आपली ताकद' अशा घोषणा देत मुलींना आत्मविश्वास देण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande