महिला संरक्षणासाठी ‘अंतर्गत तक्रार समिती’ स्थापणे बंधनकारक
छत्रपती संभाजीनगर, 9 डिसेंबर (हिं.स.)। जिल्ह्यातील सर्व व्यापारी आस्थापना व खासगी व्यावसायिकांनी कामाच्या ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम, २०१३ नुसार ज्या आस्थापनेत १० किंवा त्यापेक्षा जास्त
महिला संरक्षणासाठी ‘अंतर्गत तक्रार समिती’ स्थापणे बंधनकारक


छत्रपती संभाजीनगर, 9 डिसेंबर (हिं.स.)। जिल्ह्यातील सर्व व्यापारी आस्थापना व खासगी व्यावसायिकांनी कामाच्या ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम, २०१३ नुसार ज्या आस्थापनेत १० किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत असतील, त्या ठिकाणी अंतर्गत तक्रार समिती स्थापणे बंधनकारक असून सर्व आस्थापनांनी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करुन पोर्टलवर अपलोड करावी. त्याची प्रत कामगार उपआयुक्त कार्यालय, मालजीपूरा, स्टेशन रोड, छत्रपती संभाजीनगर येथे पाठवावी किंवा कार्यालयाच्या ई-मेलवर पाठवावी: dylabourabad@gmail.com असे आवाहन कामगार उपआयुक्त यांनी केले आहे.

समितीच्या अध्यक्षपदी वरिष्ठ महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. इतर सदस्यांमध्ये महिलांविषयक प्रश्नांवर कार्याचा अनुभव असलेले किंवा कायद्याचे ज्ञान असलेले सदस्य नेमावेत. तसेच समितीतील एकूण सदस्यांपैकी किमान ५० टक्के सदस्य महिला असणे आवश्यक आहे. महिला कर्मचाऱ्यांकडून प्राप्त होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारीवर अधिनियमानुसार चौकशी करण्याची जबाबदारी समितीची राहील.

जिल्ह्यातील १० किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या सर्व आस्थापनांनी तात्काळ अंतर्गत तक्रार समिती स्थापन करून तिची माहिती महिला व बालविकास मंत्रालयाच्या SHE Box पोर्टलवर अपलोड करावी. समिती स्थापन न केल्यास अधिनियमाच्या कलम २६ नुसार संबंधित आस्थापना मालकास ५० हजार रुपयां पर्यंत दंडाची तरतूद आहे. तसेच हा प्रकार पुन्हा घडल्यास संबंधित आस्थापनेचा परवाना/नोंदणी रद्द करून दुप्पट दंड आकारण्याचीही तरतूद आहे. याबाबत सर्व व्यापारी व व्यावसायिकांनी नोंद घ्यावी

पोर्टलवर माहिती भरल्यानंतर त्याची प्रत कामगार उपआयुक्त कार्यालय, मालजीपूरा, स्टेशन रोड, छत्रपती संभाजीनगर येथे पाठवावी किंवा कार्यालयाच्या ई-मेलवर पाठवावी: dylabourabad@gmail.com असे आवाहन कामगार उपआयुक्त यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande