
जळगाव, 9 डिसेंबर (हिं.स.) गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात ३३० रुपयांनी घट होऊन ते १,३०,०९० रुपयावर पोहोचला.तर आज २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ३०० रुपयांनी घट झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १,१९,२५० रुपये खर्च करावे लागणार आहे. सोन्याच्या दरात आज घसरण झाल्यामुळे आज सोनं खरेदी करण्याची चांगली संधी आहे. दरम्यान, आज सोन्याच्या दरात जरी घसरण झाली असली तरी चांदीच्या दरात मात्र वाढ झाली आहे. १ किलो चांदीच्या दरामध्ये तब्बल १,००० रुपयांनी वाढ झाली आहे. ही चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला १,९०,००० रुपये खर्च करावे लागणार आहे. त्यामुळे आज चांदी खरेदी करताना तुमच्या खिशाला कात्री लागणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर