रस्ते दुरूस्तीकरीता शासनाने विशेष निधी द्यावा - आ. देवयानी फरांदे
नाशिक, 9 डिसेंबर (हिं.स.)। महापालिका क्षेत्रात सांडपाणी व्यवस्थापन, सीसीटीव्ही प्रणाली उभारणी तसेच अमृत ०.२ अंतर्गत शहरात रस्ते खोदकाम करण्यात येत आहे. यामुळे रस्त्यांची दुरावस्था होत आहे. मात्र या रस्ते दुरूस्तीकरीता महापालिकेच्या अंदाजपत्रकात नि
रस्ते दुरूस्तीकरीता शासनाने विशेष निधी द्यावा आमदार देवयानी फरांदे यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी


नाशिक, 9 डिसेंबर (हिं.स.)। महापालिका क्षेत्रात सांडपाणी व्यवस्थापन, सीसीटीव्ही प्रणाली उभारणी तसेच अमृत ०.२ अंतर्गत शहरात रस्ते खोदकाम करण्यात येत आहे. यामुळे रस्त्यांची दुरावस्था होत आहे. मात्र या रस्ते दुरूस्तीकरीता महापालिकेच्या अंदाजपत्रकात निधीची तरतूद नसल्याने शासनाने रस्ते दुरूस्तीकरीता विशेष निधी उपलब्ध करून देण्याची मागणी नाशिकच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

आ.फरांदे यांनी मुख्यमंत्री फडणवीस भेट घेत नाशिकच्या रस्ते दुरूस्तीचा प्रश्न मांडला. शहरात सिंहस्थ कुंभमेळयाच्या पार्श्वभूमीवर मोठया प्रमाणावर कामे सुरू आहेत. विशेषत: सांडपाणी व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याची सुधारित व्यवस्था, सीसीटीव्ही प्रणाली उभारणी तसेच अमृत 2.0 योजनेअंतर्गत सुरु असलेल्या पाणीपुरवठा पाइपलाइनच्या कामामुळे शहरातील मुख्य रस्त्यांसह कॉलनी रोड व आंतरिक रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर खोदकाम सुरू आहे.

याव्दारे हजारो किलोमीटरच्या रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. मात्र काम झाल्यानंतर खडीकरण करून रस्ते दुरूस्त करावेत असा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. रस्त्यांच्या डांबरीकरण किंवा काँक्रीटीकरण यासाठी आवश्यक निधीची तरतूदच महापालिकेच्या अंदाजपत्रकात करण्यात आलेली नाही. महानगरपालिकेने मुख्य रस्त्यांवरील खड्डे तात्पुरत्या स्वरूपात भरले असले तरी निधीअभावी कॉलनी रोडवरील खड्डे अद्याप तसेच राहिलेले आहेत.

आगामी कुंभमेळ्यात देश-विदेशातून लाखो भाविक नाशिकमध्ये आगमन करणार असल्याने या रस्त्यांची दुरवस्था अपघात, वाहतूक कोंडी, धूळप्रदूषण आणि नागरिकांच्या हालअपेष्टा वाढवू शकते. या पार्श्वभूमीवर, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील सांडपाणी व्यवस्थापन, पाणीपुरवठा प्रकल्प व सीसीटीव्ही उभारणीमुळे बाधित झालेल्या कॉलनी रोड व लहान रस्त्यांच्या तातडीच्या दुरुस्तीकरिता महाराष्ट्र शासनाने विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.

सिंहस्थ कुंभमेळा हा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा धार्मिक सोहळा असल्याने, नाशिक शहरातील सर्व आंतरिक रस्त्यांची योग्य दुरुस्ती व्हावी यासाठी तातडीने आर्थिक मदत मिळणे आवश्यक असल्याचे मत आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी यावेळी मांडले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande