देशभरात 20 नवीन तंत्रज्ञान केंद्रे आणि 100 विस्तार केंद्रे स्थापन केली जाणार
नवी दिल्ली, 9 डिसेंबर (हिं.स.)। सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालय (एमएसएमई ) देशभरात 20 नवीन तंत्रज्ञान केंद्रे आणि 100 विस्तार केंद्रे स्थापन करण्यासाठी ''नवीन तंत्रज्ञान केंद्रे/विस्तार केंद्रांची स्थापना '' ही योजना राबवत आहे. या योजनेअंतर्गत
Ministry MSME


नवी दिल्ली, 9 डिसेंबर (हिं.स.)। सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालय (एमएसएमई ) देशभरात 20 नवीन तंत्रज्ञान केंद्रे आणि 100 विस्तार केंद्रे स्थापन करण्यासाठी 'नवीन तंत्रज्ञान केंद्रे/विस्तार केंद्रांची स्थापना ' ही योजना राबवत आहे. या योजनेअंतर्गत, तंत्रज्ञान, कुशल मनुष्यबळ आणि सल्लागार सेवांसाठी एमएसएमई च्या स्थानिक गरजांनुसार उपाय प्रदान करण्यासाठी तंत्रज्ञान केंद्रांच्या नेटवर्कची भौगोलिक पोहोच वाढविण्यात येणार आहे. यामुळे तळागाळात एमएसएमईची स्पर्धात्मकता आणि नफा वाढेल. या योजनेअंतर्गत नवीन तंत्रज्ञान केंद्रे स्थापन करण्यासाठी 20 ठिकाणांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये गया (बिहार) आणि बोकारो (झारखंड) या महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांमधील दोन ठिकाणे आहेत.

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय (एमएसएमई) देशभरातील लघु उद्योगांच्या तंत्रज्ञान उन्नतीकरण आणि डिजिटलायझेशनला प्रोत्साहन देण्यासाठी, विविध योजना आणि उपक्रम राबवत आहे, ज्यामध्ये इतर गोष्टींबरोबरच एमएसई-समूह विकास कार्यक्रम (सामान्य सुविधा केंद्र ), टूल रूम्स / तंत्रज्ञान केंद्रे , सूक्ष्म आणि लघु उद्योग (एमएसई) - परिवर्तनासाठी हरित गुंतवणूक वित्तपुरवठा (गिफ्ट) योजना आणि एमएसएमई चॅम्पियन्स योजना यांचा समावेश आहे.

हे उपक्रम आधुनिकीकरण, कौशल्य आणि गुणवत्ता वृदी , प्रगत तंत्रज्ञान पोहोच , हरित तंत्रज्ञानाचा अवलंब आणि एमएसएमईच्या सुधारित स्पर्धात्मकतेला सहाय्य करतात. सरकार उद्यम पोर्टल, एमएसएमई चॅम्पियन्स पोर्टल, गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (जीईएम), ट्रेड रिसीव्हेबल्स डिस्काउंटिंग सिस्टम (टीआरईडीएस), एमएसएमई मार्ट, एमएसएमई संबंध आणि ऑनलाइन विवाद निराकरण (ओडीआर) पोर्टल यासारख्या उपक्रमांद्वारे डिजिटलायझेशनला चालना देत आहे, ज्यामुळे डिजिटल नोंदणी, ऑनलाइन खरेदी, ई-मार्केट प्रवेश, प्राप्त करण्यायोग्य वित्तपुरवठा आणि तक्रार निवारण शक्य होत आहे आणि देशभरातील एमएसएमईंना पाठिंबा मिळत आहे.

एमएसएमई मंत्रालयाने त्यांच्या क्षेत्रातील संघटनांमध्ये 65 निर्यात सुविधा केंद्रे स्थापन केली आहेत ज्यामध्ये एमएसएमई -विकास आणि सुविधा कार्यालये, एमएसएमई तंत्रज्ञान केंद्रे आणि एमएसएमई चाचणी केंद्रे यांचा समावेश आहे.या केंद्रांचा उद्देश एमएसएमईना त्यांची निर्यात स्पर्धात्मकता वाढविण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन आणि मदत प्रदान करणे हा आहे. ही माहिती सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री (शोभा करंदलाजे) यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande