
संतोष देशमुख हत्या प्रकरण
बीड, 9 डिसेंबर (हिं.स.)।स्व. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आम्ही ठामपणे त्यांच्या सोबत उभे आहोत. असे माजलगाव चे आमदार प्रकाश सोळंके यांनी सांगितले.एक वर्ष उलटूनही या प्रकरणातील एक आरोपी अद्याप पोलिसांच्या ताब्यात नाही, ही शोकांतिका आहे. असेही ते म्हणाले
या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधारांसह सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा फाशीची शिक्षा व्हावी, हीच सर्वसामान्य जनतेची भावना आहे.
या प्रकरणातील विलंब, तपासातील त्रुटी आणि न्यायप्राप्तीचा प्रश्न आम्ही येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सभागृहात ठामपणे मांडणार आहोत तसेच मुख्यमंत्री यांचेही याकडे लक्ष वेधून तात्काळ कारवाईची मागणी करणार आहोत.याचाही उल्लेख आमदार सोळंके यांनी केला
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis