
छत्रपती संभाजीनगर, 9 डिसेंबर (हिं.स.)। राज्यामध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्याने शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले. या अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी सामाजिक जाणिवेतून मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाने पुढाकार घेत मुख्यमंत्री सहायता निधीत रू.1 कोटीचा निधी जमा केला आहे. सदरील निधीचा धनादेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे सुपूर्द केला
स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या तृत्वाने तसेच स्व.विनायकराव पाटील व स्व.दादासाहेब सावंत यांच्या पुढाकारातून 1958 साली सुरू झालेली मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ ही शैक्षणिक संस्था आज अविरतपणे ज्ञानदानाचे कार्य करीत असून ज्ञानदानाबरोबरच सामाजिक भान देखील जपण्याचे काम करत आली आहे. ज्या-ज्या वेळेस देशावर, राज्यासमोर अशा प्रकारची आपत्ती आली त्या-त्या वेळी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत या संकटाचा सामना करण्यासाठी खारीचा वाटा उचलण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. भूकंप, महापूर, दुष्काळ, कोविड अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये म.शि.प्र.मंडळाने अनेक वेळा स्वयंस्फूर्तीने मदत केली आहे...अशी माहिती आमदार सतीश चव्हाण यांनी दिली
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis