डोंबिवली : मनसे व प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी यांच्यात चर्चा
- मनसेच्या मागण्यांचा विचार करा नाहीतर खळखट्याक डोंबिवली, 9 डिसेंबर (हिं.स.)। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून प्रदुषण नियंत्रण मंडळा विरोधात शुक्रवारी पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आणि महा
मनसे व प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी यांच्या चर्चा !


- मनसेच्या मागण्यांचा विचार करा नाहीतर खळखट्याक

डोंबिवली, 9 डिसेंबर (हिं.स.)। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून प्रदुषण नियंत्रण मंडळा विरोधात शुक्रवारी पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांमधे चर्चा झाली.

यात महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे कार्यालय डोंबिवलीमधे असावे, आपल्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व प्रदुषणाची जबाबदारी कोणाची याबाबतचे डिसप्ले बोर्ड लावण्यासाठी व महापालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या प्रदुषण संदर्भात महापालिकेशी प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेला पाठपुरावा या सर्व गोष्टींची चर्चा झाली.

यावर गुरुवारी लेखी उत्तर देण्याचे आश्वासन दिले व आंदोलन न करण्याची विनंती केली. आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर कार्यालयात बसु दिले जाणार नाही अशी चेतावणी मनसेच्या माध्यमातून देण्यात आली. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संघटक तथा डोंबिवली शहर अध्यक्ष राहुल कामत, उपजिल्हा अध्यक्ष योगेश पाटील, विधानसभा सचिव अरुण जांभळे, विभाग अध्यक्ष संजय चव्हाण, रक्षीत गायकर, माजी उपसरपंच काटई काशिनाथ पाटील, विभाग सचिव अजय घोरपडे उपस्थित होते.

----------

हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi


 rajesh pande