बीड - जमिनीच्या किरकोळ वादातून महिलेसह तिच्या मुलाला बेदम मारहाण
बीड, 9 डिसेंबर (हिं.स.)। जमिनीच्या किरकोळ वादातून एका महिलेसह तिच्या मुलाला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या केज तालुक्यातील सांगवी गावात उघडकीस आला आहे. गावगुंडांनी संबंधित महिलेला आणि तिच्या मुलाला भर रस्त्यात अमानुष मारहाण केली. या
बीड - जमिनीच्या किरकोळ वादातून महिलेसह तिच्या मुलाला बेदम मारहाण


बीड, 9 डिसेंबर (हिं.स.)। जमिनीच्या किरकोळ वादातून एका महिलेसह तिच्या मुलाला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या केज तालुक्यातील सांगवी गावात उघडकीस आला आहे. गावगुंडांनी संबंधित महिलेला आणि तिच्या मुलाला भर रस्त्यात अमानुष मारहाण केली. या दुर्घटनेत महिला गंभीर जखमी झाली आहे.

गंभीर जखमी महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.अमानुष मारण्याचा व्हीडीओ मोबाईल कॅमे-यात कैद झाला असून मारहाण करणा-यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी महिलेच्या कुटुंबाने केली आहे.

बीड जिल्ह्यातील केज येथे एका महिलेला आणि तिच्या मुलाला भर रस्त्यात बेदम मारहाण करण्यात आली. जमिनीच्या वादातून ही मारहाण करण्यात आली असून याआधी या गावगुंडांच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली होती. मात्र तक्रार का नोंदवली म्हणत गावगुंडांनी महिलेची व तिच्या मुलाची रस्त्यात वाट अडवत मारहाण केली. अशी माहिती मिळाली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचे काम सुरू आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande