सोलापूरच्या पाणी प्रश्नावर नागरिकांना दिलासा देणारा निर्णय
सोलापूर, 9 डिसेंबर (हिं.स.)। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सह संपर्क मंत्री होता विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी सोलापूरचा तीन दिवसाचा दौरा केला होता यादव यांना दरम्यान त्यांनी सोलापुरातील अनेक प्रश्न आणि समस्या जाणू
सोलापूरच्या पाणी प्रश्नावर नागरिकांना दिलासा देणारा निर्णय


सोलापूर, 9 डिसेंबर (हिं.स.)। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सह संपर्क मंत्री होता विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी सोलापूरचा तीन दिवसाचा दौरा केला होता यादव यांना दरम्यान त्यांनी सोलापुरातील अनेक प्रश्न आणि समस्या जाणून घेतल्या त्या समस्यांवर नागपूर हिवाळी अधिवेशन दरम्यान त्यांनी सोलापूर शहरातील अधिकारी राजकीय नेते पत्रकार यांची बैठक आयोजित केली.

या बैठकीत सोलापूरच्या समस्यांवर अतिशय तळमळीने आणि जातीने त्यांनी लक्ष घातल्याचे पाहायला मिळाले. या बैठकीत सोलापूरकरांना आणि विशेष करून महिला वर्गाला अतिशय दिलासा देणारा निर्णय म्हणजे रात्रीचा पाणीपुरवठा बंद करण्याच्या सक्त सूचना त्यांनी महापालिका आयुक्तांना केल्या.या बैठकीत सोलापूरच्या विस्कळीत पाणीपुरवठ्यावर तब्बल दीड तास चर्चा झाली. यामध्ये प्रवीण डोंगरे, आनंद चंदनशिवे, किसन जाधव, तोफिक शेख यांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा यंत्रणेवर नाराजी व्यक्त केली. पत्रकारांनी सुद्धा अधिकाऱ्यांना या विषयात धारेवर धरले.सर्वांच्या तक्रारी आणि सूचना ऐकून घेतल्यानंतर अण्णा बनसोडे यांनी महापालिका आयुक्तांना सूचना करताना शहराचा पाणीपुरवठा लगेच दोन दिवसा आड करता येतो का आणि रात्रीचा पाणीपुरवठा बंद करून तो दिवसा करता येतो का असे विचारले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande