एनडीए संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचे बिहार निवडणुकीतील ऐतिहासिक विजयाबद्दल अभिनंदन
नवी दिल्ली, ९ डिसेंबर (हिं.स.) बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएच्या अभूतपूर्व विजयानंतर, मंगळवारी संसद भवन संकुलात झालेल्या सर्व सत्ताधारी आघाडीच्या खासदारांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान करण्यात आला. बिहारमधील विजयानंतर उपेंद्र कुशव
पंतप्रधान नरेंद्र मोदी


नवी दिल्ली, ९ डिसेंबर (हिं.स.) बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएच्या अभूतपूर्व विजयानंतर, मंगळवारी संसद भवन संकुलात झालेल्या सर्व सत्ताधारी आघाडीच्या खासदारांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान करण्यात आला. बिहारमधील विजयानंतर उपेंद्र कुशवाहा आणि संजय झा यांनी पंतप्रधानांना विजयाचा पुष्पहार अर्पण केला.

केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते या बैठकीत उपस्थित होते. जेडीयू नेते संजय झा आणि राष्ट्रीय लोक मोर्चाचे प्रमुख उपेंद्र कुशवाहा यांनी पंतप्रधान मोदींना पुष्पहार अर्पण करून सन्मानित केले.

एनडीए संसदीय पक्षाच्या बैठकीत, पंतप्रधान मोदींनी बिहारमध्ये एनडीएच्या प्रचंड विजयाचे शिल्पकार म्हणून नितीश कुमार यांचे कौतुक केले. पंतप्रधानांनी एनडीएच्या खासदारांना अर्थसंकल्पावर अभिप्राय देण्याचे आणि त्यांच्या मतदारसंघातील कार्यक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन केले.

सोमवारी, बिहारमधील एनडीए नेत्यांच्या शिष्टमंडळानेही पंतप्रधानांची भेट घेतली होती. आणि राज्यात युतीच्या ऐतिहासिक विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. बैठकीदरम्यान, पंतप्रधानांनी खासदारांना सांगितले की मोठ्या विजयासोबत मोठी जबाबदारी येते आणि त्यांना लोकांच्या कल्याणासाठी अधिक उत्साहाने काम करण्याचे आवाहन केले.

२४३ जागांच्या बिहार विधानसभा निवडणुकीत, एनडीएने २०२ जागा जिंकल्या. त्यापैकी भाजपने ८९, जेडीयूने ८५ जागा जिंकल्या. शिवाय, एलजेपी (रामविलास) ने १९ जागा, एचएएम (धर्मनिरपेक्ष) ने ५ जागा आणि राष्ट्रीय लोक मोर्चाने ४ जागा जिंकल्या. या विजयासह, नितीश कुमार १० व्यांदा मुख्यमंत्री बनले.

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande