नांदेड मनपावर शिवसेनेचा भगवा फडकवा; आ. बोंढारकरांचे आवाहन
नांदेड, 9 डिसेंबर (हिं.स.)। नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या होणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेचा विजयी भगवा सन्मानाने फडकवावा यासाठी इच्छुकांसह पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आ. आनंदराव पाटील बोंढारकर या
नांदेड मनपावर शिवसेनेचा भगवा फडकवा; आ. बोंढारकरांचे आवाहन


नांदेड, 9 डिसेंबर (हिं.स.)। नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या होणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेचा विजयी भगवा सन्मानाने फडकवावा यासाठी इच्छुकांसह पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आ. आनंदराव पाटील बोंढारकर यांनी केले आहे. ते नांदेड दक्षिण भागातील शिवसेनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी पुढे बोलताना आ. आनंदराव बोंढारकर म्हणाले की , नुकत्याच झालेल्या नगरपरिषदेच्या निवडणूक भारतीय जनता पार्टीने जाणीवपूर्वक शिवसेनेसोबत युती केली नाही. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या निवडणुका शिवसेना अत्यंत ताकतीने आणि नियोजनबद्ध रित्या लढणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ भाई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि नामदार हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीत निश्चितपणे शिवसेनेचा विजय भगवा फडकेल मात्र यासाठी इच्छुकांसह शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे कामाला लागले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

शिवसेनेत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला संधी मिळालेली आहे . भविष्यातही अशी संधी नक्कीच मिळेल . माझ्यासारख्या शेतकरी कुटुंबातील एका तरुणाला शिवसेनेने आणि तुम्ही आमदार केलात. ज्या पद्धतीने विधानसभेच्या निवडणुकीत हेमंत भाऊ पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकून मला आमदार बनवलात त्याचप्रमाणे आता हेमंत भाऊ पाटील आणि माझ्यावर विश्वास ठेवून नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेची सत्ता शिवसेनेचे हाती द्या. नांदेड दक्षिणचाच नव्हे तर संपूर्ण नांदेड शहराच्या विकासाचा कायापालट करून दाखवू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

यावेळी संपर्कप्रमुख दत्तात्रय पईतवार,शिवसेना जिल्हाप्रमुख विनय पाटील गिरडे,जिल्हा संघटक शंकर पिनोजी,युवासेना जिल्हाप्रमुख बाळु पाटील मोरे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख वनमाला राठोड, शहरप्रमुख तुलजेश यादव, सुहास खराणे पाटील यांच्यासह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande