
नांदेड, 9 डिसेंबर (हिं.स.)।नांदेडमध्ये एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात पोलिसांना यश मिळाले या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
शहराच्या आंबेडकरनगर भागात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना त्यांनी आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता एकाजवळ बाळगत असलेल्या विनापरवाना गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. दोघांकडून दोन खंजर अशा तिघांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच पाहिजे फरारी असलेले आरोपी हद्दपार व अजामीनपात्र वॉरंटमधील आरोपी, जेल रिलीज, आरोपी तसेच अवैधरित्या शस्त्र व अग्नीशस्त्र ताब्यात बाळगणारे आरोपी, मालाविरुद्ध व शरीराविरुद्ध गुन्हे करणारे गुन्हेगार यांच्याविरुद्ध कार्यवाही करण्याकरिता नांदेड जिल्ह्यात कोम्बींग ऑपरेशनचे आयोजन केले होते.
त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे व त्यांची टिम ही पोलीस स्टेशन शिवाजीनगर हद्दीत कोम्बींग ऑपरेशन करत असताना त्यांना मिळालेल्या माहितीवरून आंबेडकरनगर भागातून एक अग्नीशस्त्र (पिस्तूल) व दोन जिवंत काडतूस तसेच तेहरानगर भागातून दोन खंजीर पंचांसमक्ष जप्त केले आहे.
त्या संबंधाने पोलीस स्टेशन शिवाजीनगर, नांदेड येथे दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis