लंडनमध्ये ‘ट्रॉफी चोर' नक्वीच्या गाडीची पोलिसांनी घेतली झडती
लंडन, 9 डिसेंबर (हिं.स.)।पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) चे अध्यक्ष आणि देशाचे गृहमंत्री मोहसिन नकवी यांची लंडनमध्ये प्रचंड बेइज्जती झाल्याचे सांगितले जात आहे. ब्रिटिश पोलिसांनी “ट्रॉफी चोर” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नकवी यांच्या गाडीला अडवून तिची त
लंडनमध्ये ‘ट्रॉफी चोर' नक्वीच्या गाडीची पोलिसांनी घेतली झडती


लंडन, 9 डिसेंबर (हिं.स.)।पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) चे अध्यक्ष आणि देशाचे गृहमंत्री मोहसिन नकवी यांची लंडनमध्ये प्रचंड बेइज्जती झाल्याचे सांगितले जात आहे. ब्रिटिश पोलिसांनी “ट्रॉफी चोर” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नकवी यांच्या गाडीला अडवून तिची तपासणी केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या प्रकारातून आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची प्रतिमा काय आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

माहितीनुसार, नकवी शहजाद अकबर आणि आदिल राजा यांच्या प्रत्यार्पणाबाबत चर्चा करण्यासाठी ब्रिटनमध्ये गेले होते. मात्र लंडन पोलिसांनी नकवी यांच्या गाडीची तपासणी का करण्यात आली, यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसते की ब्रिटिश पोलिसांनी नकवी यांच्या गाडीला थांबवून सर्व बाजूंनी तपासणी केली. व्हिडिओ पाहता हे रुटीन चेकिंग नसल्याचे दिसते, कारण पोलिसांनी गाडीची अत्यंत बारकाईने तपासणी केली.मीडिया रिपोर्टनुसार, ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी जात असताना नकवी यांच्या गाडीची तपासणी करण्यात आली. नकवी हे पीसीबीचे अध्यक्ष असून आशियाई क्रिकेट परिषद (एसीसी) चेही अध्यक्ष आहेत.

दरम्यान, भारताने जिंकलेल्या आशिया कपची ट्रॉफी नकवी यांनी स्वतःकडेच ठेवली आहे आणि अजून ती भारताला दिलेली नाही. यंदाच्या फाइनलमध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव करून आशिया कप जिंकला होता, परंतु भारतीय संघाने नकवी यांच्या हातून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता.यानंतर भारतीय खेळाडूंनी ट्रॉफीशिवायच जल्लोष केला होता आणि टीम इंडिया ट्रॉफी न घेता देशात परतली होती. भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाने (बीसीसीआय) अलीकडेच नकवी यांना ट्रॉफी सुपूर्द करण्यासाठी ई-मेल पाठवला होता. परंतु नकवी यांचा आग्रह आहे की तेच स्वतः विजेत्या संघाच्या हाती ट्रॉफी देणार.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande