
नांदेड, 9 डिसेंबर (हिं.स.)।नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका अंतर्गत “प्रधानमंत्री आवास योजना ” योजनेसाठी शहरस्तरीय तांत्रीक कक्षातील तज्ञांची कंत्राटी ही पदे एकत्रित वेतनावर /कंत्राटी तत्वावर भरण्यासाठी दि.17.11.2025 रोजी जाहीरात प्रसिध्द करण्यात आली होती. सदर पदाच्या मुलाखती दि.10.12.2025 रोजी पालिकेच्या आयुक्त कक्ष येथे आयोजित केली होती.
तथापि, महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका-2025 अनुषंगाने बहुतांश अधिकारी व कर्मचारी हे निवडणूक कामात व्यस्त असल्याने, दि.10.12.2025 रोजी आयोजित करण्यात आलेल्या कंत्राटी पदाच्या मुलाखती पुढील आदेशापर्यंत पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत, या बदलाची सर्व इच्छुक उमेदवारांनी नोंद घेण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis