
नाशिक, 9 डिसेंबर (हिं.स.)। अशोका ग्रुप ऑफ स्कूल्सने अर्जुननगर आणि अशोका मार्ग कॅम्पससाठीचा भव्य ‘परफॉर्मन्स डे दादासाहेब गायकवाड सभागृहात अत्यंत यशस्वीपणे आयोजित केला. विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली साकारल्या जाणार्या उत्कृष्ट कलाविष्कारांसाठी ओळखल्या जाणार्या या वार्षिक सोहळ्याने यंदाही संगीत, गायन, नृत्य आणि नाट्यप्रयोगांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले—आणि विशेष म्हणजे प्रत्येक सादरीकरण पूर्णतः विद्यार्थ्यांनीच संयोजित आणि सादर केले.
अशोकातील परफॉर्मन्स डेची खासियत म्हणजे प्रत्येक वाद्य, प्रत्येक गीत आणि प्रत्येक नृत्यरचना विद्यार्थ्यांनीच मंचावर प्रत्यक्ष सादर करणे. हे संस्थेच्या सर्वांगीण विकासावरील श्रद्धेचे आणि व्यावसायिक पातळीवरील कलाप्रशिक्षणाच्या बांधिलकीचे द्योतक आहे.
यंदाच्या वर्षी दोन्ही कॅम्पसने सर्जनशीलता आणि सांस्कृतिक वैविध्य अधोरेखित करणार्या स्वतंत्र संकल्पना सादर केल्या.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, लाभलेले प्रख्यात व्हायोलिनवादक, संगीत संयोजक आणि राज कपूर यांच्या अनेक चित्रपटांमध्ये योगदान देणारे . परेश पारिख यांनी विद्यार्थ्यांच्या प्रामाणिकतेचे, आशयपूर्ण सादरीकरणांचे आणि व्यावसायिक ऊर्जेचे मनापासून कौतुक केले.या परफॉर्मन्स डे कार्यक्रमांना एनएमआरडीए आयुक्त जलज शर्मा आणि नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या उच्च दर्जाच्या सादरीकरणास दाद देत, दिली
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV