पुणे - डॉ. आढाव यांना श्रद्धांजली म्हणून मार्केट यार्डातील फळ, भाजीपाला उद्या राहणार बंद
पुणे, 9 डिसेंबर (हिं.स.)। जेष्ठ कामगार नेते डॉ. बाबासाहेब आढाव यांचे वृद्धापकाळाने सोमवारी (ता. ८) सायंकाळी ८.३० वाजता पुण्यातील पूना हॉस्पिटल येथे निधन झाले. कष्टकरी, बांधकाम मजूर आणि असंघटित कामगारांसाठी सातत्याने लढा देणारे हे ज्येष्ठ नेते अचानक
APMC Pune Krushi


पुणे, 9 डिसेंबर (हिं.स.)। जेष्ठ कामगार नेते डॉ. बाबासाहेब आढाव यांचे वृद्धापकाळाने सोमवारी (ता. ८) सायंकाळी ८.३० वाजता पुण्यातील पूना हॉस्पिटल येथे निधन झाले. कष्टकरी, बांधकाम मजूर आणि असंघटित कामगारांसाठी सातत्याने लढा देणारे हे ज्येष्ठ नेते अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने कामगार व व्यापारी वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.

डॉ. आढाव यांना श्रद्धांजली म्हणून पुणे मार्केट यार्डातील संपूर्ण फळे-भाजीपाला विभाग उद्या बुधवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काल रात्रीच बंदची मागणी होत होती, मात्र शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, हीच बाबांची भूमिका असल्याने बंद बुधवारी करण्यात येणार असल्याचे कामगार संघटनांच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.

दरम्यान, डॉ. आढाव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शोकसभा गुरुवार, ता. ११ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता शारदा गजानन मंदिरासमोर, मार्केट यार्ड येथे आयोजित करण्यात आली आहे. ही सभा श्री छत्रपती शिवाजी महाराज कामगार युनियन पुणे तसेच विविध घटक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने होणार असून सर्व संबंधितांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande