सोलापूर - शिवसाम्राज्य सामाजिक प्रतिष्ठानचा पाचवा वर्धापनदिन उत्साहात संपन्न
सोलापूर, 9 डिसेंबर (हिं.स.)। शिवसाम्राज्य सामाजिक प्रतिष्ठानचा पाचवा वर्धापनदिन उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून करण्यात आली. संस्थेने गेल्या पाच वर्षांत केलेल्या उपक्रमांची माहिती यावेळी सादर
सोलापूर - शिवसाम्राज्य सामाजिक प्रतिष्ठानचा पाचवा वर्धापनदिन उत्साहात संपन्न


सोलापूर, 9 डिसेंबर (हिं.स.)। शिवसाम्राज्य सामाजिक प्रतिष्ठानचा पाचवा वर्धापनदिन उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून करण्यात आली. संस्थेने गेल्या पाच वर्षांत केलेल्या उपक्रमांची माहिती यावेळी सादर करण्यात आली.गडकिल्ले संवर्धन, रक्तदान शिबीर, ‘शिवविचार’ पदयात्रा, छत्रपती संभाजी महाराज जयंती अशा विविध उपक्रमांद्वारे संस्थेने सामाजिक बांधिलकी जपल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

“शिवविचार फक्त विचारात नाही, तो आचरणात उतरायला हवा. तरुणांना व्यसनमुक्त करणे हे आमचे प्राधान्य आहे,” असे मार्गदर्शन या वेळी करण्यात आले.कार्यक्रमात संस्थापक अध्यक्ष दिनेश भैय्या वरपे, छत्रपती ब्रिगेडचे अध्यक्ष श्याम भैय्या कदम, अरविंद जी शेळके, मल्लु भैय्या सलगरे यांनी मनोगत व्यक्त केले.पदाधिकारी आकाश रेवने, गौरीशंकर वरपे, करण सिद्धगवळी, सुरज हिरेमठ, हरीकांत माडेकर, किरण शिरकुल, रवी सिद्धगवळी, सुमित मंद्रुपकर यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande