
सोलापूर, 9 डिसेंबर (हिं.स.)।सशस्त्र सेना ध्वजदिन २०२५ निधी संकलनासाठी सोलापूर जिल्हयासाठी शासनाने रुपये १ कोटी ७२ लाख इतके उद्दिष्ट दिले आहे. मागील वर्षी शासनाने दिलेल्या एक कोटी ७२ लाख उद्दिष्टापेक्षा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली दोन कोटी १७ लाख १५ हजार ४७० म्हणजेच उद्दिष्टाच्या १२६टक्के पूर्तता झालेली आहे. तरी सन २०२५ निधी संकलनाचे उद्दिष्ट सर्व शासकीय यंत्रणांनी वेळेत पूर्ण करावे, असे आवाहन एनसीसीच्या महाराष्ट्र बटालियन ९ चे कमान अधिकारी कर्नल रणधीर सतीश यांनी केले.
सशस्त्र सेना ध्वजदिन २०२५ निधी संकलन शुभारंभ कार्यक्रम आज बहुउद्देशीय सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे कर्नल रणधीर सतिश, कमान अधिकारी, ९ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली व प्रशासकीय अधिकारी, ९ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, सोलापूर ले. कर्नल शरब बाचर, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सोलापूर मेजर मिलिंद देवदत्त तुंगार (निवृत्त),पोलीस उप आयुक्त अश्विनी पाटील, पोलीस निरीक्षक, विशेष शाखा, सोलापूर शहर वैष्णवी पाटील, पोलीस निरीक्षक ,राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक१० सोरेगांव, सोलापूरदिलीप तडाखे, नालसा विधिज्ञ लक्ष्मण पाटील, अध्यक्ष, माजी सैनिक संघटना सोलापूर अरुणकुमार तळीखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड