
बीड, 9 डिसेंबर (हिं.स.)। राज्यस्तरीय ब्राह्मण अधिवेशनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यस्तरीय ब्राह्मण अधिवेशन १ फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ८ या वेळेत एमआयटी कॉलेजजवळील मंथन हॉल, बीड बायपास येथे हे अधिवेशन होईल. स्वागत अध्यक्ष सचिन वाडे पाटील यांनी ही माहिती दिली.
या अधिवेशनात विविध क्षेत्रातील उद्योजक आणि मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. अधिवेशनाच्या तयारीसाठी झालेल्या बैठकीस विजय काजे, संदेश देशपांडे, संतोष जोशी, विवेक जोशी, काशिनाथ चांदजकर, महेश कुलकर्णी, रवींद्र पंडित, धनंजय नारळे, संतोष कुलकर्णी, जितेंद्र तरटे, प्रवीण खणाळे, रेणुका दास कुलकर्णी उपस्थित होते. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी ब्राह्मण समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्वागत अध्यक्ष सचिन वाडे पाटील यांनी केले आहे. बीड जिल्ह्यातील सर्व ब्राह्मण समाजाने या अधिवेशनात सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय पेशवा संघटना बीडच्या वतीने केले आहे.
------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis