परभणी - आर.पी. हॉस्पिटल मध्ये अत्याधुनिक डर्माटो-लेसर विभाग सुरू
परभणी, 9 डिसेंबर (हिं.स.)। आ.डॉ. राहुल पाटील यांच्या आर.पी. हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटने आरोग्यसेवेत एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला असून हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक डर्माटो-लेसर विभाग म्हणजे त्वचा आणि केस रोगावर अत्याधुनिक लेसर थेरपीद्वारे उपचार या
परभणी - आर.पी. हॉस्पिटल मध्ये अत्याधुनिक डर्माटो-लेसर विभाग सुरू


परभणी, 9 डिसेंबर (हिं.स.)। आ.डॉ. राहुल पाटील यांच्या आर.पी. हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटने आरोग्यसेवेत एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला असून हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक डर्माटो-लेसर विभाग म्हणजे त्वचा आणि केस रोगावर अत्याधुनिक लेसर थेरपीद्वारे उपचार या लेसर विभागाचे उद्घाटन आज हॉस्पिटलचे अधिष्ठता डॉ.प्रमोद शिंदे यांच्या हस्ते पार पडले.

आर.पी.हॉस्पिटल येथे अत्याधुनिक आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी आर.पी हॉस्पिटल जगातील नवनवीन तंत्रज्ञान परभणीत आणत आहे. त्याचाच एक भाग म्हणून डर्माटो लेसर अद्यावत विभागाची सुरूवात आज करण्यात आली आहे.

या प्रसंगी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित तडवी, डॉ. फैज, डॉ. करण जाधव, डॉ. रेवती तसेच नव्याने सुरू झालेल्या त्वचारोग विभागाचे प्रमुख डॉ. मनीष कदम आणि डॉ. दिनेश भूतडा हे उपस्थित होते.

यावेळी डॉ.प्रमोद शिंदे म्हणाले,“आज आपण फक्त एक नवीन विभाग सुरू करत नसून परभणी आणि संपूर्ण मराठवाड्यातील जनतेला जगातील सर्वोत्तम त्वचा व केसांच्या लेसरद्वारे उपचारांची सुविधा आपल्या शहरातच उपलब्ध करून देत आहोत. ग्रामीण व निमशहरी भागातील रुग्णांना मुंबई-पुण्यात जाण्याची गरज यापुढे भविष्यात पडणार नाही, ही खूणगाठ आपण सर्वांनी बांधायची आहे.

लवकरच येथे विशेष सवलतीच्या पॅकेजेस आणि मोफत त्वचा तपासणी शिबिरांचेही आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाने दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande