धामणगाव रेल्वेत स्ट्रॉगरूमला एसआरपी, नगरपालिका कर्मचारी व पोलिसांचा 24 तास खडा पहारा
अमरावती, 9 डिसेंबर (हिं.स.) नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी २ डिसेंबरला मतदान झालेल्या सर्व मशीन वीस दिवसांसाठी स्ट्रांगरूममध्ये सीलबंद झाल्या आहेत. या स्ट्रॉगरूमला एसआरपी, नगरपालिका कर्मचारी व पोलिसांचा 24 तास खडा पहारा ठेवण्यात आला आहे. त्
धामणगाव रेल्वेत स्ट्रॉगरूमला एसआरपी, नगरपालिका कर्मचारी व पोलिसांचा 24 तास खडा पहारा


अमरावती, 9 डिसेंबर (हिं.स.)

नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी २ डिसेंबरला मतदान झालेल्या सर्व मशीन वीस दिवसांसाठी स्ट्रांगरूममध्ये सीलबंद झाल्या आहेत. या स्ट्रॉगरूमला एसआरपी, नगरपालिका कर्मचारी व पोलिसांचा 24 तास खडा पहारा ठेवण्यात आला आहे. त्यांच्या जोडीला सीसीटीव्हीच्या मअध्यमातून चौफेर नजर ठेवण्यात आली आहे.येथील नगरपालिका निवडणुकीसाठी मंगळवारी ६७.२ टक्के मतदारांनी मतदान केले. धामणगावात २१ मतदान केंद्रांवर मतदान झालेली सर्व मतदान यंत्रे निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी, पोलिस अधिकारी, उमेदवार व उमेदवारांचे प्रतिनिधी यांच्या समक्ष दृढकक्ष सील करून पोलिस प्रशासनांच्या ताब्यात देण्यात आला. मतमोजणीची तारीख पुढे ढकलल्यामुळे दृढ कक्षाला कडक सुरक्षा व्यवस्था करावी लागली आहे. त्या ठिकाणी २१ तारखेपर्यंत राज्य राखीव पोलिस दलाचे दहा सशस्त्र कर्मचारी कायमस्वरुपी तैनात करण्यात आले आहेत. त्यांच्या जोडीला स्थानिक पोलिस प्रशासनातील प्रत्येक ४८ तासांसाठी आठ पोलिसांचा २४ तास खडा पहारा ठेवण्यात आला आहे. त्यांच्या जोडीला नगरपालिकेचे प्रत्येक आठ तासाला दोन असे २४ तासांत तीन शिफ्टमध्ये सहा कर्मचारी देण्यात आले आहेत.

अशी आहे सुरक्षा व्यवस्था

पोलीस अधिकारी - चार

सीसीटीव्ही-चार

सशस्त्र एसआरपी-१०

सशस्त्र पोलिस-१०

नगरपालिका कर्मचारी-६

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande