

डोंबिवली, 9 डिसेंबर (हिं.स.)। विष्णुनगर पोलीस ठाणे, डोंबिवली पश्चिम येथे दाखल असलेल्या मोबाईल हरविल्याच्या तक्रारीमधील चार लाख रूपये किंमतीचे एकुण २६ वेगवेगळया कंपन्यांचे मोबाईल वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विष्णुनगर पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई ७८७३ शिंदे, यांनी सी.ई.आय. आर. पोर्टलच्या माध्यमातून शोधले असून सदरचे सर्व मोबाईल फोन हे मंगळवारी दिनांक ९ डिसेंबर रोजी सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग सुहास हेमाडे यांच्या हस्ते संबंधीत तक्रारदार यांना परत करण्यात आले.
कल्याण परिमंडळ 3 पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त डोंबिवली विभाग सुहास हेमाडे यांच्या आदेशानुसार विष्णूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम चोपडे व पोलिस शिपाई रोहिदास शिंदे व पथकाने सायबर सायबर गुन्हेतील गहाळ झालेले व चोरी झालेले मोबाईल यांचा तपास पोलीस शिपाई रोहिदास शिंदे व पथकाने केला होता.
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi