इंडोनेशियात एका सात मजली कार्यालयाच्या इमारतीला भीषण आग; २० जणांचा मृत्यू
जकार्ता, 9 डिसेंबर (हिं.स.)।इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथील केमायोरन परिसरात मंगळवार दुपारी सात मजली ऑफिस इमारतीत लागलेल्या आगीमुळे मोठा अपघात झाला. या दुर्घटनेत किमान 20 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण अजूनही इमारतीत अडकले असल्याची भीती व्यक्त
इंडोनेशियात एका सात मजली कार्यालयाच्या इमारतीला भीषण आग;  २० जणांचा मृत्यू


जकार्ता, 9 डिसेंबर (हिं.स.)।इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथील केमायोरन परिसरात मंगळवार दुपारी सात मजली ऑफिस इमारतीत लागलेल्या आगीमुळे मोठा अपघात झाला. या दुर्घटनेत किमान 20 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण अजूनही इमारतीत अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आग आटोक्यात आणली असून इमारतीत बचाव व शोधकार्य सुरू आहे. ही माहिती सेंट्रल जकार्ता पोलिस प्रमुख सुसात्यो पुरनोमो कोंड्रो यांनी दिली.

कोंड्रो यांच्या मते, आग दुपारच्या सुमारास इमारतीच्या पहिल्या मजल्यावर लागली आणि हळूहळू वरच्या मजल्यांपर्यंत पसरली. आग लागली तेव्हा अनेक कर्मचारी लंच करत होते, तर काही ऑफिसमधून बाहेर गेले होते. जकार्ता डिजास्टर मॅनेजमेंट एजन्सी ( बीपीबीडी ) चे प्रमुख इस्नावा अदजी यांनी सांगितले की आगीच्या कारणांची चौकशी सुरू असून झालेल्या नुकसानीचेही मूल्यांकन करण्यात येत आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, आग नेमकी कशी लागली हे अजूनही तपासाचा विषय आहे.

आग विझवण्यासाठी 28 अग्निशमन गाड्या आणि 101 अग्निशमन कर्मचारी घटनास्थळी तैनात करण्यात आले होते. मृत आणि जखमी व्यक्तींना ओळख आणि उपचारासाठी क्रामत जाती पोलिस हॉस्पिटल, पूर्व जकार्ताला हलवण्यात आले आहे.ही इमारत टेरा ड्रोन इंडोनेशियाचे मुख्यालय आहे. ही कंपनी खाणकाम, शेती इत्यादी विविध क्षेत्रांना हवाई सर्व्हे ड्रोन सेवा पुरवते. अधिकाऱ्यांनी सांगितले की बचावकार्य पूर्ण होईपर्यंत ही इमारत पूर्णपणे सील ठेवली जाईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande