
जळगाव, 9 डिसेंबर, (हिं.स.) - ख्रिसमस आणि नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून खास ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई, नागपूर आणि पुण्याहून ७६ विशेष रेल्वे धावणार आहेत. यातील काही गाड्यांना जळगाव, भुसावळ, पाचोरा, चाळीसगावला थांबा देण्यात आला असून यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांची सोय झाली आहे. 01401 ही साप्ताहिक विशेष गाडी १९ डिसेंबर ते २ जानेवारी या काळात धावणार आहे. पुणे येथून प्रत्येक शुक्रवारी २०.३० वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी १४.०५ वाजता पोहोचेल.
परतीच्या प्रवासाला दर शनिवारी नागपूर येथून १६.१० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ११.४५ वाजता पोहोचेल. दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा, धमनगाव आणि वर्धा या स्थानकावर ही ट्रेन थांबणार आहे. मुंबई-नागपूर-मुंबई यादरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे ख्रिसमस अन् नव्या वर्षासाठी स्पेशल ट्रेन सुरू करण्यात आली आहे. 01005 ही साप्ताहिक विशेष गाडी २० डिसेंबर ते ३ जानेवारी या दरम्यान धावणार आहे. सीएसएमटी स्थनाकातून प्रत्येक शनिवारी ००.३० वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी १५.३० वाजता पोहोचेल. तर परतीच्या प्रवासाला प्रत्येक शनिवारी नागपूर येथून १८.१० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०८.२५ वाजता पोहोचेल दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या स्थानकावर ही ट्रेन थांबेल. पुणे–अमरावती साप्ताहिक विशेष २० डिसेंबर ते ३ जानेवारी या काळात धावेल. 01403 ही साप्ताहिक विशेष गाडी दर शनिवारी पुणे स्थानकातून १९.५५ वाजता सुटेल आणि पुढील दिवशी ०९.२५ वाजता अमरावती येथे पोहोचेल. 01404 ही साप्ताहिक विशेष गाडी दर रविवारी अमरावती येथून १२.०० वाजता सुटेल आणि पुणे येथे पुढील दिवशी ००.१५ वाजता पोहोचेल. दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मुर्तिजापूर आणि बडनेरा या स्थानकात ही ट्रेन थांबेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर