
मुंबई, 9 डिसेंबर (हिं.स.)। भटक्या कुत्र्यांसदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशनुसार राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना सूचना देण्यात आल्या असून त्याची अंमलबजावणी युद्धपातळीवर सुरु असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली. मुंबई महापालिका क्षेत्रातील भटक्या कुत्र्यांसंदर्भातील लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना श्रीमती मिसाळ बोलत होत्या.
सदस्य अतुल भातखळकर, चेतन तुपे, महेश लांडगे, सुरेश प्रभू यांनी या लक्षवेधीवरील चर्चेत सहभागी झाले होते. या संदर्भात लोकप्रतिनिधीची बैठक घेण्यात येईल, अशी माहिती श्रीमती मिसाळ यांनी यावेळी सांगितले.
नगरविकास राज्यमंत्री श्रीमती मिसाळ म्हणाल्या, भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर असून याबाबत सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा निर्देश दिले आहेत. यामध्ये भटक्या कुत्र्यांना पकडून निर्बीजिकरण, लसीकरण व जंतू निर्मूलन करणे, या श्वानांसाठी आश्रय/निवाऱ्याची सोय करणे, रुग्णालयांनी अँटी रेबीज लसचा अनिवार्य साठा ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी राज्यस्तरावर आणि स्थानिक स्तरावर नोडल अधिकारी नेमण्यात आले आहे. या विषयासंदर्भात संयुक्त बैठक उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री, ग्रामविकास मंत्री व राज्यमंत्री यांच्याकडे घेण्यात येईल, असे महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर