जळगाव : वर्षभरात 190 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले
जळगाव , 9 डिसेंबर (हिं.स.)जिल्ह्यात सुमारे साडेसात लाख हेक्टर क्षेत्रावर तब्बल सहा लाख 44 हजार शेतकरी कुटुंबाची गुजराण आहे. अतीवृष्टी, अवर्षण वा अन्य नैसर्गीक आपत्ती नुकसान, अल्प उत्पन्न वा नापीकीमुळे तसेच कर्जबाजारीपणामुळे 2025 च्या वर्षभरात आतापर
जळगाव : वर्षभरात 190 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले


जळगाव , 9 डिसेंबर (हिं.स.)जिल्ह्यात सुमारे साडेसात लाख हेक्टर क्षेत्रावर तब्बल सहा लाख 44 हजार शेतकरी कुटुंबाची गुजराण आहे. अतीवृष्टी, अवर्षण वा अन्य नैसर्गीक आपत्ती नुकसान, अल्प उत्पन्न वा नापीकीमुळे तसेच कर्जबाजारीपणामुळे 2025 च्या वर्षभरात आतापर्यत 50, 100 नव्हेतर तब्बल 190 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. यात वर्षभरात 190 शेतकरी आत्महत्या पहाता दर दोन दिवसात एक आत्महत्या झाल्या असल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात जानेवारी ते डिसेंबर 2025 या कालावधीत तब्बल 181 शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. तर दुसरीकडे आत्महत्याग्रस्त कुटुंबियांकडून सादर झालेल्या मदत प्रस्तावापैकी जिल्हा प्रशासनाकडून केवळ निम्मे 90 प्रस्ताव पात्र झाले आहेत. तसेच इ70 प्रस्ताव विविध कारणामुळे अपात्र म्हणून फेटाळल्याने मदतीपासून वंचीत आहेत. तसेच 21 प्रस्ताव प्रलंबीत असल्याचे प्रशासकिय आकडेवारीवरून दिसून येत आहे.जिल्ह्यात मागील हंगामात कापूस, सोयाबीनला दर मिळाला नाही. यंदा जानेवारी दरम्यान बेमोसमी पाऊस, गारपीट वादळवाऱ्यांसह जून ते ऑक्टोबर दरम्यान अतिवृष्टीसह पूर नैसर्गीक आपत्तीमुळे अनेकांची खरीप पीके हातून गेली. यामुळे पीककर्जासह सावकारी कर्जपरतफेड न झाल्याने कर्जबाजारीपणा वाढल्यामुळे अनेक शेतकरी अडचणीत आले. शासनाकडून कर्जमाफीची शक्यता होती, ती झाली नाही. या सर्व अडचणी वाढल्याने शेतकरी आत्महत्येची समस्याही तीव्र झाल्याचे दिसत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande