Custom Heading

स्वातंत्र्यवीरांवर टीका करण्यासाठी जीभ वळतेच कशी?
स्वातंत्र्यवीरांसारख्या राष्ट्रभक्त व्यक्तिमत्त्वावर आरोपच काय टीका करण्यापूर्वी दहावेळा विचार करायल
veer savarkar


स्वातंत्र्यवीरांसारख्या राष्ट्रभक्त व्यक्तिमत्त्वावर आरोपच काय टीका करण्यापूर्वी दहावेळा विचार करायला हवा. मुळात त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी देशासाठी सहन केलेल्या, हिंदु समाजासाठी सहन केलेल्या सर्व यातनांना स्वीकारण्याची ताकद वा कुवत किती मवाळ वा जहाल काँग्रेसजनांमध्ये त्या काळात होती. अर्थात त्यांनी आपापल्या परीने देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान दिले होते. मात्र काही राजकीय व्यक्तिमत्त्वांनी आपल्या महत्त्वासाठी, क्रांतिकारकांचे बलिदान, योगदान याबाबत डोळे जाणीवपूर्वक झाकले होते, हाच खरे म्हणजे मोठा दोष आहे. या दोषाला कारणीभूत असणारे तत्कालिन सर्व विचारसरणीचे नेते, पक्ष वा संघटना हे स्वीकारणार आहेत का?

हे सांगण्याचे कारण की, क्रांतिकारक आणि गांधीवाद, कामगार संघटना, डाव्या विचारसरणीच्या साम्यवादी संघटना यांमधील कार्यकर्ते आणि नेते यांनी देशासाठी आपापल्या परीने केलेले कार्य आजच्या सर्व भारतीयांनी लक्षात ठेवून त्या पद्धतीने वर्तन आणि नर्तनही करायला हवे.

खरे म्हणजे सर्वसामान्य भारतीय नागरिकांनीही आपल्या पोटासाठी केल्या जाणाऱ्या धावपळीच्या युगात हे भान अधिक राखून त्या पद्धतीने विचार करून निर्णय घ्यायला हवेत. देशासाठी योगदान देणारे, बलिदान देणारे केवळ अहिंसावादी वा गांधीवादी नव्हते तर अन्य विचारसरणीचे आणि खास करून क्रांतिकारकाचा वसा घेणारे असंख्य - अज्ञातही होते. त्यामुळेच जेव्हा स्वातंत्र्य मिळाले ते भलेही पाकिस्तानच्या निर्मितीनंतर वा देशाची फाळणी होऊनही मिळाले तरी देशाच्या या स्वातंत्र्याबद्दल स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केलेले स्वागत, सर्व प्रकारच्या स्वातंत्र्यलढ्यातील कार्यकर्त्यांचा त्यासाठी असणारा मोलाचा वाटा आहे हे मान्य करीत, स्वीकारीत त्यांनी व्यक्त केलेला आनंद, त्यावेळचे वक्तव्य वाचण्यासारखे आहे. मात्र असे असूनही राजकारण, सत्ताभिलाषा आणि आपले लोकांवरील वर्चस्व राखण्याच्या लालसेपायी गांधी हत्येनंतरच्या आरोपांना, अभियोगाला सावरकर यांना तोंड देण्याची वेळ आणणाऱ्या अनेक ‘आततायीं’चा विचारही नव्या पिढीने करायला हवा. किंबहुना त्यावेळी आरोपातून ज्या हिंदुत्ववादी समविचारींना सोयीस्करपणे वगळले गेले होते, अशा व्यक्ती-व्यक्ती समूहाबरोबरही सत्ताधारी तत्कालिन काँग्रेस सरकारने काही साटेलोटे केले होते की काय, असा विचार करायला वाव राहू शकतो. यामुळेच सावरकरांना निर्दोष सोडले जाऊनही आजच्या काळातही त्या अभियोगातील त्यांच्यावर ठेवलेल्या आरोपांबाबत सवाल करणाऱ्या आजच्या काळातील नेते, प्रवक्ते वा पक्ष-पक्षप्रमुख, कार्यकर्ते यांची शरम वाटावी, अशी स्थिती आणली गेली आहे.

सावरकरांवर माफीवीर म्हणून बेछूट आणि निर्बुद्ध आरोप करणाऱ्या वा ‘ते तुमचे आणि हे आमचे’ असे सांगत सुटणाऱ्या तरुण काँग्रेस नेत्यांनाही पुन्हा बिगरीपासून भारतीय भाषेमध्ये शिक्षण घेण्याची सक्ती करण्याची गरज आहे. इतकेच नव्हे तर त्याची री ओढणाऱ्या, उदो उदो करणाऱ्यांनाही स्वातंत्र्यासाठी प्राण वेचणाऱ्या क्रांतिकारकांबद्दल आस्था वाटायलाच हवी. स्वातंत्र्यासाठी जीवन वेचणारे, योगदान, बलिदान देणाऱ्या सर्वच स्वातंत्र्यसैनिकांचा मान राखायला हवा. त्याच्या नावाने राजकारण करून आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न त्यांनी टाळायलाच हवा. अशा गैरमार्गी नेत्यांनी आपले हातही पोळले जाणार आहेत, हे लक्षात ठेवले पाहिजे. अन्यथा स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षानंतरही हेे सारे कॉमनवेल्थमधील ब्रिटिशांचे गुलामच म्हणावे लागतील.

- रवींद्र यशवंत बिवलकर

https://www.facebook.com/PRAJWALANT/?ref=pages_you_manage

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande