अनन्याने दिली आर्यनला गांजा पुरवल्याची कबुली
मुंबई, 23 ऑक्टोबर (हिं.स.) : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी नवोदित अभिनेत्री अनन्या पांडेची एनसीबी मार्फत
अनन्या पांडे


मुंबई, 23 ऑक्टोबर (हिं.स.) : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी नवोदित अभिनेत्री अनन्या पांडेची एनसीबी मार्फत चौकशी सुरू आहे. अनन्या पांडे हिने शुक्रवारी 22 ऑक्टोबर रोजी झालेल्या चौकशीदरम्यान आर्यनला गांजा पुरवल्याची कबुली दिलीय. आर्यनला केवळ दोन वेळा गांजा पुरवल्याचे अनन्याने सांगितले. दरम्यान कुठल्याही ड्रग्ज सप्लायरशी आपला संपर्क नसल्याचे तिने यावेळी स्पष्ट केले.

एनसीबीच्या चौकशीदरम्यान अनन्याने अनेक गोष्टींचे खुलासे केले. एनसीबीच्या चौकशीत अनन्या पांडेने मान्य केले की तिने आर्यन खानला वीड म्हणजेच गांजा आणून दिला होता पण ती कुठल्याही ड्रग्स सप्लायरच्या संपर्कात नव्हती. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जे चॅट एनसीबीच्या हाती लागले आहेत त्यानुसार, अनन्या पांडेने एनसीबीला सांगितले की ती गांजा सप्लाय करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीच्या संपर्कात नाही. मात्र तिचा एक मित्र आहे जो खूप मोठा व्यक्ती आहे. त्याला सांगितल्यावर तो गांजा अरेंज करून देतो. आर्यन खानच्या सांगण्यावरून फक्त एकदा किंवा दोनदाच त्याला गांजा आपल्या या मित्राकडून मागून दिला. अनन्याच्या मित्राने त्याच्या घरी काम करणाऱ्या कर्मचाऱ्याकडून गांजा पाठवल्याचे एनसीबीला सांगितलं. हा गांजा अनन्याने आपल्या स्टाफ द्वारे कलेक्ट केला होता जे नंतर तिने आर्यनला दिला.

अनन्याची चौकशी का होतेय ?

अनन्या पांडेची गुरुवारी सुमारे 2 तास चौकशी करण्यात आली. अनन्या पांडेला ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानसोबत झालेल्या चॅटच्या आधारावर बोलावले होते. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चॅटमध्ये असा आरोप केला जात आहे की अनन्या गांजाबद्दल बोलत होती. आर्यन त्या चॅटमध्ये गांजाची व्यवस्था करण्याबद्दल बोलत होता असाही आरोप आहे. मात्र, पहिल्याच दिवशी चौकशीदरम्यान अनन्याने आरोप नाकारले होते.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande