भंडारा : लाखनीत संस्थाचालकांचा परिचरावर गोळीबार, संस्थाचालकाला अटक
भंडारा २३ ऑक्टोबर (हिं.स.) : लाखनी शहरातील विदर्भ महाविद्यालयात संस्थाचालक व त्याच महाविद्यालयात भूग
image aaropi


भंडारा २३ ऑक्टोबर (हिं.स.) : लाखनी शहरातील विदर्भ महाविद्यालयात संस्थाचालक व त्याच महाविद्यालयात भूगोल विभाग प्रमुख महाविद्यालयात कार्यरत असलेल्या परिचराला बंदुकीने गोळी झाल्याने गंभीर केल्याची घटना विदर्भ महाविद्यालयात घडली आहे. सुभाष आगाशे असे गंभीर जखमी परिसराचे नाव असून अमित गायधनी असे मारेकरी संस्था चालक व भूगोल विभाग प्रमुख भाजप पदाधिकाऱ्याचे नाव आहे. गोळीबाराचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

संस्थाचालक असलेल्या अमित गायधनी हा नवशक्ती पीठ शिक्षण संस्था मुरमाडी/सावरीमध्ये सहसचिव असून या संस्थेअंतर्गत असलेल्या विदर्भ महाविद्यालय लाखनीमध्ये भूगोल विभाग प्रमुख म्हणून प्राध्यापक आहे. तसेच भाजपामध्ये उच्चपदस्थ पदाधिकारी म्हणून कार्यरत आहे.

आपल्या राजकीय पक्षाचा व मोठ्या ओळखीचा फायदा घेत महाविद्यालयात कार्यरत कर्मचाऱ्यांना नेहमी हमरीतुमरीची भाषा करून अपमानित व खजिना केले जाते अशीच तक्रार महाविद्यालयात कार्यरत प्राध्यापकांनी दिली असून संपूर्ण महाविद्यालय प्रशासन या संस्थाचालकांच्या या मुजोरीपणाला वैतागले असल्याची चर्चा गावात आहे. त्यामुळे आजही आकसापोटी सदर संस्थाचालकाने कर्तव्यावर कार्यरत असलेल्या परिचरावर बंदुकीने गोळी झाडल्यामुळे सदर परिचराच्या छातीजवळ गंभीर दुखापत झाल्याने नागपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती आहे. याप्रकरणी पसार होण्याच्या तयारीत असलेल्या संस्थाचालकाला लाखनी पोलिसांनी भंडाऱ्यात अटक केली आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande