चित्रीकरणादरम्यान अभिनेत्याच्या जवळील बंदुकीमुळे सिनेमॅटोग्राफरचा मृत्यू
लॉस एंजल्स, 23 ऑक्टोबर (हिं.स.) चित्रीकरणादरम्यान अभिनेत्याच्या जवळील बंदुकीतून सुटलेल्या गोळीमुळे
चित्रीकरणादरम्यान अभिनेत्याच्या जवळील बंदुकीमुळे सिनेमॅटोग्राफरचा मृत्यू


लॉस एंजल्स, 23 ऑक्टोबर (हिं.स.) चित्रीकरणादरम्यान अभिनेत्याच्या जवळील बंदुकीतून सुटलेल्या गोळीमुळे एका सिनेमॅटोग्राफरचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना न्यू मेक्सिको येथील सांता फे परगण्यात घडली. हलिना हचिन्स (४२) असे या सिनेमॅटोग्राफरचे नाव होते.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘रस्ट’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अभिनेते अॅलेक बाल्डविन यांच्या हातात अभिनयासाठी बंदुक देण्यात आली होती. मात्र चुकून त्यांच्या हातातून सुटलेली गोळी ही हलिना हचिन्स यांना लागली. तसेच दिग्दर्शक जोएल सोझा (४८) हेही यात जखमी झाले.

हचिन्स यांना न्यू मेक्सिको विद्यापीठाच्या रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तर जोएल यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर चित्रपटाचे चित्रीकरण अनिश्चित काळासाठी थांबवण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील चौकशी सुरु आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande