पेट्रोल,डिझेलच्या किंमतीत पुन्हा 35 पैशांची वाढ
नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर (हिं.स.) : पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत आज, शनिवारी लागोपाठ चौथ्या दिवशी 35 पै
संग्रहित


नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर (हिं.स.) : पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत आज, शनिवारी लागोपाठ चौथ्या दिवशी 35 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत प्रतिलीटर 107.24 रुपये इतकी झाली आहे. तर डिझेल 95.97 रुपयांवर पोहचले आहे.

आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईनेही पेट्रोल-डिझेल दरवाढीचा उच्चांक गाठला आहे. मुंबईमध्ये पेट्रोल प्रतिलीटर 113.12 रुपये आणि डिझेल प्रतिलीटर 104 रुपयांवर पोहचले आहे. देशातील सर्व मोठ्या महानगरांपैकी पेट्रोल-डिझेलच्या सर्वाधिक किमती मुंबईत आहेत. तर कोलकाता आणि चेन्नईमध्ये पेट्रोलच्या किंमती क्रमशः 107.78 रुपये प्रति लिटर आणि 104.22 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 99.08 रुपये प्रति लिटर आणि 100.25 रुपये प्रति लिटर आहे.

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका सुरु झाला होता. मागील 20 दिवसांपासून देशात पेट्रोल जवळपास प्रतिलीटर 6.05 रुपयांनी महागले आहे. तसेच मागील 23 दिवसांपासून देशात डिझेल प्रतिलीटर 7.35 रुपयांनी महागले आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये सतत वाढ होत असल्यामुळे इंधन दरवाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रुड ऑईलची किंमत प्रति बॅरल 85 डॉलरपर्यंत पोहचली आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून इंधन दरवाढ सुरु आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande