नाशिक - 'नो हेल्मेट नो पेट्रोल'चे उल्लंघन; पेट्रोल पंपाना कारणे दाखवा नोटीस
नाशिक, २४ ऑक्टोबर, (हिं.स) नाशिक शहरातील पंचवटी परिसरातील तीन पेट्रोल पंपावर ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’
नाशिक - 'नो हेल्मेट नो पेट्रोल'चे उल्लंघन; पेट्रोल पंपाना कारणे दाखवा नोटीस


नाशिक, २४ ऑक्टोबर, (हिं.स) नाशिक शहरातील पंचवटी परिसरातील तीन पेट्रोल पंपावर ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’ चे उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे. पंचवटी पोलिसांनी याबाबत गांधी, पालीजा आणी खालसा या तीन पेट्रोल पंपांना कारणे दाखवा नोटीस बजावत तुमचे ना हरकत प्रमाणपत्र का रद्द करु नये असा जाब विचारला आहे.या कारवाईने ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’ चे उल्लंघन करणार्या शहरातील इतर पेट्रोल पंप चालकांचे धाबे दणाणले आहेत.

पोलीस आयुक्त दिपक पांण्डेय यांनी शहरात ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’ ही मोहीम सुरु केली आहे. वाहनचालकांनी हेल्मेट घातले नसेल तर त्यांना पेट्रोल दिले जाऊ नये अशी सक्त ताकीद आहे. मात्र, अनेक पेट्रोल पंप चालक हा नियम फाट्यावर ठेवत आहे. अखेर या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी अॅक्शन घेतली असून त्यांच्या हद्दितील तीन पेट्रोल पंपांवर धडक कारवाई करुन त्यांना कारणे दाखवा नोटिस बजावली आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande