रॉयल नेदरलँड नौदलाच्या कमांडरांची पश्चिम नौदल विभाग मुख्यालयाला भेट
मुंबई, 24 ऑक्टोबर (हिं.स.) : रॉयल नेदरलँड नेव्हीचे कमांडर ऍडमिरल रेने टास यांनी दिनांक 22 ऑक्टोबर 21
रॉयल नेदरलँड नौदलाच्या कमांडरांची पश्चिम नौदल विभाग मुख्यालयाला भेट


मुंबई, 24 ऑक्टोबर (हिं.स.) : रॉयल नेदरलँड नेव्हीचे कमांडर ऍडमिरल रेने टास यांनी दिनांक 22 ऑक्टोबर 21 रोजी मुंबईतील पश्चिम नौदल विभागाच्या मुख्यालयाला भेट दिली आणि पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएसएम, एडीसी, फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ व्हाइस एडमिरल आर हरी कुमार यांच्याशी चर्चा केली.

वेस्टर्न नेव्हल कमांडच्या यूके कॅरियर स्ट्राइक ग्रुप 21 चा एक भाग म्हणून कोकण शक्ती-21 या जहाजासोबत ह्या सरावात भाग घेणाऱ्या रॉयल नेदरलँड्स नौदलाच्या एच एन एल एम एस एव्हरस्टेन (HNLMS Evertsen) जहाजाचे मुंबईत आगमन झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही भेट दिली आहे.

या संवादादरम्यान, दोन्ही ॲडमिरल्सनी प्रादेशिक स्थैर्य वाढवण्याचे मार्ग आणि पध्दती यावर चर्चा केली, कारण समुद्रमार्गे जगभरात होणाऱ्या व्यापाराचा मोठा हिस्सा इंडो-पॅसिफिक प्रदेशातून होतो. त्यांनी दोन्ही नौदलांमधील वाढत्या सहकार्याला बळकटी देण्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध पध्दतींचाही अंदाज घेतला.

त्यानंतर, ऍडमिरल रेने तास यांनी, रॉयल नेदरलँड नेव्हीच्या चमूसह, आयएनएस कोचीला भेट दिली. फ्लीट ऑपरेशन्स ऑफिसर कमोडोर आदित्य हारा आणि आयएनएस कोचीचे कमांडिंग ऑफिसर कॅप्टन हिमाद्री बोस यांनी त्यांचे जहाजावर स्वागत केले. शिष्टमंडळाने जहाजाच्या सभोवताली एक मार्गदर्शित फेरफटका मारला, त्यावेळी त्यांना जहाजाच्या क्षमता आणि कार्यवाहीबद्दल अवगत करण्यात आले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande