डॉ. एस. जयशंकर यांनी झांबियाला दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा
नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर (हिं.स) परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ सुब्रमण्यम जयशंकर यांनी झांबियाचे पर
डॉ. एस. जयशंकर यांनी झांबियाला दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा


नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर (हिं.स)

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ सुब्रमण्यम जयशंकर यांनी झांबियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री स्टॅन्ली काकुबो, झांबिया सरकार तसेच जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

ट्वीटरद्वारे डॉ सुब्रमण्यम जयशंकर म्हणाले, "झांबियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री स्टॅन्ली काकुबो आणि जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. दोन्ही देशांच्या सुदीर्घ अनुबंधांसाठी कटिबद्ध आहोत."

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande