Custom Heading

भारत विरुद्ध पाकिस्तान : सामना पाहण्यासाठी भारतीय क्रिकेट चाहता सुधीर हजर
नवी दिल्ली, २४ ऑक्टोबर, (हिं.स.) : ट्वेन्टी-20 विश्वचषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान हा हायव्होल्टेज स
भारत विरुद्ध पाकिस्तान : सामना पाहण्यासाठी भारतीय क्रिकेट चाहता सुधीर हजर


नवी दिल्ली, २४ ऑक्टोबर, (हिं.स.) : ट्वेन्टी-20 विश्वचषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान हा हायव्होल्टेज सामना आज रविवारी दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना सायंकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे. प्रत्येक सामन्याप्रमाणे या सामन्यालाही भारताचा ‘डाय हार्ट फॅन’ सुधीर हजर असणार आहे. यावेळी सुधीरने भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.

मी भारतीय संघाचे मनोबल वाढवण्यासाठी आणि विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी खूप उत्साहाने येथे आलो आहे. आतापर्यंत भारताने पाकिस्तानला कायमच पराभूत केल्याचा विक्रम आहे. भारत २००७ प्रमाणे यावेळी देखील विजयी होईल अशी मला आशा आहे, असेही तो म्हणाला.

भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, के. एल. राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, इशान किशन, शार्दूल ठाकूर, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती, राहुल चहर

पाकिस्तानी संघ : बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, फखर जमान, मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, आसिफ अली, इमाद वसीम, शादाब खान, हॅरिस रॉफ, हसन अली, शाहीन शाह आफ्रिदी, हैदर अली.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande