२८व्या अखिल भारतीय आरपीएफ ॲथलेटिक चॅम्पियनशिपचा समारोप
मुंबई, २५ ऑक्टोबर (हिं.स.) : मध्य रेल्वेच्या आरपीएफ दलाने आयोजित केलेल्या ४ दिवसांच्या २८व्या अखिल भ
२८व्या अखिल भारतीय आरपीएफ ॲथलेटिक चॅम्पियनशिपचा समारोप


मुंबई, २५ ऑक्टोबर (हिं.स.) : मध्य रेल्वेच्या आरपीएफ दलाने आयोजित केलेल्या ४ दिवसांच्या २८व्या अखिल भारतीय आरपीएफ ऍथलेटिक चॅम्पियनशिप मेगा इव्हेंटचा आज मोठ्या दिमाखात समारोप झाला. श्री अनिल कुमार लाहोटी, महाव्यवस्थापक मध्य रेल्वे प्रमुख पाहुणे म्हणून समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. मीनू लाहोटी, अध्यक्षा, मध्य रेल्वे महिला कल्याण संघटन या देखील या प्रसंगी अतिथी म्हणून उपस्थित होत्या.

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री अनिल कुमार लाहोटी यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, ही अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे की, या स्पर्धेत १०६ महिलांनीही उत्साहाने भाग घेतला. ते पुढे म्हणाले की, क्रीडा क्रियाकलाप केवळ तंदुरुस्त ठेवत नाहीत तर सांघिक भावना देखील मजबूत करतात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध क्रीडा स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना रेल्वेने नेहमीच पाठिंबा दिला आहे आणि त्यांचा आदर केला आहे, असे त्यांनी व्यक्त केले. विजेत्यांचे अभिनंदन करताना त्यांनी ही चॅम्पियनशिप स्पर्धा यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाचेही अभिनंदन केले.

उत्कृष्ट सहभाग आणि रंगीत मार्च पास्टने स्पर्धेची उत्स्फूर्तता व अनेक संभाव्य स्वप्नांच्या आकांक्षा दर्शविल्या.

तत्पूर्वी, संघ व्यवस्थापक आणि ज्युरी सदस्यांची प्रमुख पाहुण्यांशी ओळख करून देण्यात आली आणि महिला आणि पुरुषांसाठी १०० मीटर धावण्याच्या अंतिम स्पर्धा घेण्यात आल्या. श्री अजोय सादानी, प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त-कम-आईजी/ आरपीएफ यांनी या मेळाव्याचे स्वागत केले आणि श्री जितेंद्र श्रीवास्तव, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त (सह)/ आरपीएफ मुंबई यांनी स्पर्धेचा अहवाल वाचला.

प्रमुख पाहुणे श्री अनिलकुमार लाहोटी यांच्या हस्ते करंडक व पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. दक्षिण रेल्वे १७ सुवर्ण, १० रौप्य आणि १ कांस्य पदकांसह एकूण २८ पदकांसह अव्वल तर मध्य रेल्वे ९ सुवर्ण, ४ रौप्य आणि ७ कांस्य पदकांसह एकूण २० पदकांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande