सोलापूर - पाथरुट चौकात आवास योजनेचे मार्गदर्शन शिबीर
सोलापूर, 26 ऑक्टोबर (हिं.स) आमदार प्रणिती शिंदे यांच्या वतीने अण्णा भाऊ साठे महामंडळ, संत रोहिदास म
सोलापूर - पाथरुट चौकात आवास योजनेचे मार्गदर्शन शिबीर


सोलापूर, 26 ऑक्टोबर (हिं.स) आमदार प्रणिती शिंदे यांच्या वतीने अण्णा भाऊ साठे महामंडळ, संत रोहिदास महामंडळ, महात्मा फुले महामंडळ व इतर महामंडळ आणि मागासवर्गीयांसाठी समाजकल्याण विभागामार्फत असलेल्या योजनांचा तसेच रमाई आवास योजनांचे मार्गदर्शन शिबिर पाथरूट चौकात आयोजित केले होते.

या वेळी आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, शासन मागासवर्गीयांसाठी अनेक योजना आखत असते पण त्या योजना लोकांपर्यंत पोचत नाहीत. समाजकल्याण विभाग, महामंडळे, रमाई आवास योजना आदी योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत, युवकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शिबिराच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत. यावेळी विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी युवकांचे, नागरिकांचे अर्ज भरून घेण्यात आले.या वेळी बार्टीचे अधिकारी सोनकांबळे, अश्विनी सुपाते, समता दूत कारंजे, मनपाचे पुजारी, समाज कल्याण अधिकारी चाबुकस्वार, संत रोहिदास महामंडळाचे लंकेश्वर, महात्मा फुले महामंडळाचे प्रशांत तेलंग, अण्णा भाऊ साठे महामंडळाचे जगधने, महापालिकेचे गणेश कोळी, यांनी विविध योजनांची व रमाई आवास योजनेची माहिती दिली.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande