Custom Heading

३२ वी राज्य फेन्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत औरंगाबादला सर्वसाधारण विजेतेपद, कोल्हापूर उपविजेता
कोल्हापूर, २६ ऑक्टोबर (हिं.स.) : येथे पार पडलेल्या ३२ व्या राज्यस्तरीय वरिष्ठ गट फेन्सिंग अजिंक्यपद
३२ वी राज्य फेन्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत औरंगाबादला सर्वसाधारण विजेतेपद, कोल्हापूर उपविजेता


कोल्हापूर, २६ ऑक्टोबर (हिं.स.) : येथे पार पडलेल्या ३२ व्या राज्यस्तरीय वरिष्ठ गट फेन्सिंग अजिंक्यपद स्पर्धेमध्ये औरंगाबाद संघाने सर्वसाधारण विजेतेपद मिळवले. फॉईल वैयक्तिकमध्ये दोन्ही गटात, इपी व सायबरच्या दोन्ही गटात औरंगाबादच्या खेळाडूंनी सुवर्णपदक मिळवत स्पर्धेवर वर्चस्व सिद्ध केले. कोल्हापूर संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. आमदार चंद्रकांत जाधव व जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांच्या प्रमुख उपस्थिती डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्याहस्ते विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.

शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात २३ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत या स्पर्धा संपन्न झाल्या. महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशन, शिवाजी विद्यापीठ डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ आणि कोल्हापूर फेन्सिंग असोसिएशन या स्पर्धेचे आयोजन केले होते.

स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी सायबर सांघिक प्रकारात औरंगाबाद संघाने महिला व पुरुष या दोन्ही गटात सुवर्णपदक प्राप्त केले. महिला गटात कशीश भरड, संस्कृती पडुल, अपूर्वा रसाळ व गार्गी डोंगरे यांचा समावेश असलेल्या औरंगाबाद संघाने तेजस्विनी तारळे, दुर्गा नांदूरडीकर, आदिती सोनवणे यांचा सामवेश असलेल्या नाशिक संघावर विजय मिळवत सुवर्ण पदक जिंकले. नाशिकला रौप्य पदकवर समाधान मानावे लागले. शर्वरी गोसेवडे, विज्ञानी उमठ, काजल गुप्ता व श्रुती जोशी यांच्या नागपूर आणि उर्वरी मानकर, निशा पुजारी, प्राची सिंग व सृष्टी औसरकर यांच्या ठाणे संघाला कांस्य पदक मिळाले. पुरुष सांघिक गटात अभय शिंदे, श्रेयस जाधव, विशाल दानवे व निघाली वाघ यांच्या औरंगाबाद संघाने कोल्हापूर संघाला पराभूत करत सुवर्णपदकवर नाव कोरले. धनंजय जाधव, प्रतीक पाटील, श्रीशैल्य शिंदे व ऋषीराज पोवार यांच्या कोल्हापूर संघाला रौप्य पदकवर समाधान मानावे लागले. यश सोनटक्के, मुकुल भेंडारकर,मुशर्रफ खान व आयुष कहाते यांच्या नागपूर व सोमुशंकर मोपन्नवर, धीरज माने व शिवा यादव यांच्या पालघर संघाने कांस्य पदक मिळवले. सायबरमध्ये औरंगाबादचा दबदबा

सायबर वैयक्तिकमध्ये दोन्ही गटात औरंगाबादने सुवर्ण पदक प्राप्त केले. पुरुष गटात अभय शिंदे याला सुवर्ण कोल्हापूरच्या प्रतिक जाधव याला रौप्य तर कोल्हापूरच्याच श्रीशैल शिंदे व पार्थ जाधव याना कांस्य पदक मिळाले. मुलीच्या गटात औरंगाबादच्या कशिश भराड हिल सुवर्ण, नागपूरच्या श्रुती जोशीला रौप्य तर औरंगाबादच्या अपुर्वा रसाळ व लातूरच्या माही आरदवाडला कांस्य पदक मिळाले.

फॉईल वैयक्तिकमध्ये औरंगाबादला सुवर्ण

रविवारी झालेल्या फेन्सिंगच्या फॉईल वैयक्तिक प्रकारात पुरुष गटात औरंगाबादच्या शाकेर सय्यद याने सुवर्णपदक पटकावले. कोल्हापूरच्या अनिल मठपती याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.पालघरच्या शीव यादव व औरंगाबादच्या तेजस पाटील याना कांस्य पदक मिळाले. फॉईल महिला गटात औरंगाबादच्या वैदेही लोहिया हिने मुंबईच्या वैभवी इंगळे हिल पराभूत करत सुवर्णपदक प्राप्त केले. मुबई उपनगरच्या खुशी दुखंडे व पालघरच्या अनुजा लाड या दोघींना कांस्य पदकवर समाधान मानावे लागले.

विजेत्यांचा गौरव

सोमवारी सायंकाळी या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, आमदार चंद्रकांत जाधव व जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांच्या प्रमुख उपस्थिती विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर पंच, मार्गदर्शक, राज्य पद्पादाधिकारी यांचाही गौरव करण्यात आला. यावेळी डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त पृथ्वीराज पाटील, शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, प्र- कुलगुरू डॉ. शिंपा शर्मा, रजिस्ट्रार विश्वनाथ भोसले, डी.वाय.पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक ए के गुप्ता, वित्त अधिकारी श्रीधर स्वामी, डी. वाय. पाटील पोलीटेक्निकचे प्राचार्य डॉ. महादेव नरके, शिवराज महविद्यालय गडहिंग्लजचे संस्थाध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे, महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनचे सल्लागार अशोक दुधारे, कार्याध्यक्ष प्रकाश काटोळे, सचिव उदय डोंगरे, खजिनदार राजकुमार सोमवंशी, स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष संजय जाधव, कोल्हापूर फेन्सिंग असोसिएशनचे सचिव, विनय जाधव आदींची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आमदार चंद्रकांत जाधव यांनी लक्ष्य निश्चित करून आव्हानावर मात केल्यास यश निश्चित असल्याचे सांगितले. ऑलिम्पिकमधील यशाचा मार्ग या स्पर्धेच्या उत्कृष्ट नियोजनातून अधिक प्रशस्त झाला आहे. नामदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली फेन्सिंग्ला नवी उंची मिळेल असा विश्वास व्यक्त केला. जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांनी खेळांच्या अधिक विकासा व्हावा यासाठी हरियाणाप्रमाने विशेष प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले. शालेय स्तरापासून खेळाडू तयार करण्यासाठी शासन व संघटना यांच्या एकत्रित प्रयत्नाची गरज असल्याचे ते म्हणाले.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आयोजन समितीचे अध्यक्ष संजय जाधव, सचिव विनय जाधव, डॉ. राजेंद्र रायकर, डॉ. बाबासाहेब उलपे, डॉ. राम पोवार, गजानन बेडेकर, राहुल मगदूम, प्रफुल्ल धुमाळ, संदीप जाधव, संभाजी मिरजे, दीपक क्षीरसागर यांच्यासह जिल्हा संघटनेचे पदाधिकारी व संयोजन समिती पदाधिकाऱ्यानी प्रचंड मेहनत घेतली.

महाराष्ट्र संघाची निवड जाहीर

या स्पर्धेतून निवडलेला २४ जणांचा संघ राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. जानेवारीमध्ये होणाऱ्या या स्पर्धेसाठी निवडलेला महाराष्ट्र संघ पुढीलप्रमाणे- फॉईल पुरुष -शाकेर सय्यद (औरंगाबाद) अनिल मठपती (कोल्हापूर), शीव यादव (पालघर) तेजस पाटील (औरंगाबाद), फॉईल महिला वैदेही लोहिया(औरंगाबाद), वैभवी इंगळे (मुंबई) खुशी दुखंडे (मुंबई उपनगर), अनुजा लाड (पालघर), ईपी पुरुष-प्रथमकुमार शिंदे(कोल्हापूर), गिरीश जकाते(सांगली), निखील कोहाड(भंडारा), मोरेश्वर पाटील(सांगली), ईपी महिला- माही आरदवाड (लातूर), नम्रता यादव(पालघर), ज्ञानेश्वरी शिंदे(लातूर), वामा मनियार(पालघर), सायबर पुरुष सुवर्ण अभय शिंदे (औरंगाबाद), प्रतिक जाधव(कोल्हापूर), श्रीशैल शिंदे (कोल्हापूर), पार्थ जाधव (कोल्हापूर), सायबर मुली- कशिश भराड (औरंगाबाद), श्रुती जोशी (नागपूर), अपुर्वा रसाळ (औरंगाबाद) माही आरदवाड (लातूर)

कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर फेंसिंगला अधिकच वलय प्राप्त झाले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली त्याच्याच जिल्ह्यात अत्यन्त कमी कालावधी नेटक्या नियोजनाने राज्यस्तरीय मोठी स्पर्धा यशस्वी झाली आहे. अत्यंत शिस्तबद्धरीतीने पार पडलेली ही स्पर्धा, स्पर्धक, कोच, पंच, पदाधिकारी यांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून घेतलेली काळजी याबद्दल सर्वच मान्यवर व खेळाडूंनी सतेज पाटील यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे खेळाडू नक्कीच ऑलिम्पिकपर्यंत पोहोचतील असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande