भगवान श्रीकृष्णाद्वारे कर्मयोगाचे योग्य स्पष्टीकरण
पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्ती जीवनात समृद्ध होण्यासाठी जीवन व्यवस्थापन शिकू इच्छितो, आनंदी होऊ इच्छितो
Karma Yoga by Lord Krishna


पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्ती जीवनात समृद्ध होण्यासाठी जीवन व्यवस्थापन शिकू इच्छितो, आनंदी होऊ इच्छितो, शांत मन बाळगू इच्छितो आणि जीवनाचे उद्दिष्ट स्पष्ट करू इच्छितो. भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये जीवनाच्या प्रत्येक पैलूवर खूप खोलवर स्पष्टीकरण दिलेले आहे. गीतेत सांगितलेले तीन मार्ग म्हणजे कर्म योग(कृतीचा योग), ज्ञान योग(ज्ञानाचा मार्ग) आणि भक्ति योग (भक्तीचा मार्ग).

सनातन धर्माचे चुकीच्या पद्धतीने चित्रण करून बदनाम करण्यासाठी "कर्मयोग" बद्दल अनेक गैरसमज पसरवले जात आहेत. एक गैरसमज असा आहे की एखाद्याला फक्त देवाची भक्ती करणे आवश्यक आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या "कर्म" (कृती) नकरता त्याच्या इच्छा पूर्ण होतील. आणखी एक गैरसमज असा आहे की जी लोक कोणत्याही प्रकारचे कार्य करतात त्यांनी ते फुकट करावे.

लोक या स्वयं-विकसित अर्थांद्वारे सनातन धर्माची थट्टा करतात, चुकीची माहिती पसरवतात आणि वाईट हेतूने सनातन धर्माविरुद्ध काम करतात.

कर्मयोगाचा खरा आणि खोल अर्थ समजून घेऊया :

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।

मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि॥ २-४७

भगवान श्रीकृष्णाने "अक्रियेत क्रिया आणि कृतीत निष्क्रियता" ही संकल्पना सुंदरपणे स्पष्ट केली आहे. जेव्हा श्रीकृष्ण फळांची अपेक्षा न करता आपले कर्तव्य प्रामाणिकपणे करा असे सांगतात. याचा अर्थ काय?

मानसशास्त्रीयदृष्ट्या, जर आपण एखाद्या प्रोजेक्ट/टास्क/अॅक्टिव्हिटीवर काम करत असताना सतत निकालावर लक्ष केंद्रित केले तर ते चिंता आणि एक प्रकारचा अवांछित दबाव निर्माण होत असतो ज्यामुळे कार्यक्षमता आणि सर्जनशीलतेवर परिणाम होतो, तणाव वाढवतो, अनेक प्रकरणांमध्ये ते संबंधांवर वाईट परिणाम घडवतात, संपूर्ण क्रियाकलापांवर वाईट परिणाम होतो. परिणामाचा सतत विचार करण्याऐवजी सर्व लक्ष त्या कामावर केंद्रित केले तर सहज कार्य पूर्णत्वास येते. आपण अर्धवट कृती करण्याऐवजी आणि त्याच्या परिणामावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आपण जे काही करतो त्यात मग्न राहावे अशी भगवान श्रीकृष्णांची इच्छा आहे. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतः कडून बर्याच अपेक्षा ठेवून निकालावर लक्ष केंद्रित करते आणि जर निकाल योजनेनुसार आला नाही तर ती व्यक्ती निराश होते आणि भविष्यात धोका न घेण्याची मानसिकता विकसित करते.

उदाहरणार्थ : विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर वाईट परिणाम होतो जेव्हा ते अभ्यासामध्ये 100% प्रयत्न करण्याऐवजी केवळ निकालावर लक्ष केंद्रित करतात, स्वतःसाठी समस्या निर्माण करतात, मादक पदार्थांचे व्यसन करायला लागतात, अभ्यासात रस कमी होऊ लागतो, आयुष्य कंटाळवाणे वाटू लागते, कमकुवत मन निर्माण व्हायला सुरुवात होते, नैराश्य, चिंता आणि हळूहळू आत्महत्येची प्रवृत्ती विकसित होते.

भगवान श्रीकृष्णाची इच्छा आहे की आपण वर्तमान क्षणात जगावे आणि प्रत्येक कृती एक दैवी कृती म्हणून करावी, मग ते कार्य लहान असो वा मोठे, कोणतेही कार्य चांगल्या हेतूने करणे, भले ते आवडत असेल किंवा नसेल, सोपे किंवा अवघड, तुमच्या चांगल्या कार्याची कोणी प्रशंसा करो वा नको व तुम्ही कार्य करताना तुम्हाला कोणी पाहत नसेल तरी तुम्ही तुमचे काम प्रामाणिकपणे, प्रभावीपणे केले पाहिजे, याला दैवी उपासना समजावे जे तुमची बांधिलकी आणि योग्य वृत्ती दर्शवते. नि:स्वार्थी समाजकार्य हा निव्वळ कर्मयोग नसून जे काही योग्य हेतूने केले जाते; जे समाज, पर्यावरण आणि देशासाठी चांगले आहे, जीवनाचे मूल्य वाढवते, अहंकार, आसक्ती आणि स्वार्थी हेतूशिवाय, केलेल्या कार्याला "कर्मयोग" म्हणतात.

अहंकार व्यक्तीच्या अमर्यादित आणि अवांछित इच्छा पूर्ण करण्यासाठी जागरूकता, गतिशीलता, सर्जनशीलता, नाविन्यपूर्ण क्षमता, नेतृत्व या घटकांवर वाईट परिणाम करतॊ.

कोणत्याही कामाबद्दल किंवा व्यक्तीबद्दल जास्त आसक्तीमुळे शेवटी निराशा, नकारात्मकता येते जेव्हा त्यांच्याकडून अपेक्षित गोष्टी इच्छेनुसार होत नाहीत. या कारणामुळे भगवान श्रीकृष्ण म्हणतात, प्रत्येक गोष्ट आनंदाने आणि पूर्ण भक्तीने करा, पण त्याच्याशी आसक्त होऊ नका.

भगवद्गीता कर्मयोग 3.35

श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्टितात्।

स्वधर्मे निधनं श्रेयःपरधर्मो भयावहः॥

या श्लोकात भगवान श्रीकृष्ण म्हणतात, "फक्त "स्व" बना", तुमच्या धर्माचे (योग्यमार्गाचे) अनुसरण करा. आपल्या कल्पनेवर खरे व्हा आणि आपण काय बनले पाहिजे याबद्दल जाणीवपूर्वक विचार करा. इतरांसारखे होण्यासाठी स्वतःची फसवणूक करू नका. तुम्ही उत्कृष्ट गोलमाल करणारे असलात तरी तुमच्या मनात भीती कायम घर करून बसते. जेव्हा तुम्ही "स्व" वर लक्ष केंद्रित करता तेव्हा तुम्हाला अंतर्भूत क्षमता कळतात ज्या तुम्हाला नवीन यशाच्या उंचीवर नेऊ शकतात आणि खरा आनंद तुम्ही उपभोगू शकता. भगवान श्रीकृष्ण आंतरिक संपत्ती आणि क्षमता शोधण्यासाठी नियमित सराव म्हणून काही श्लोकांमध्ये "ध्यान धारणा" सुचवतात.

नकर्मणामनारम्भान्नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते।

न च संन्यसनादेव सिद्धिंसमधिगच्छति ॥3.4॥

कर्मापासून दूर राहून कर्मापासून मुक्ती मिळत नाही; तसेच केवळ त्याग केल्याने त्याला परिपूर्णता प्राप्त होतनाही. भगवान श्रीकृष्णाने वरील श्लोकाद्वारे सर्व शंका दूर केल्या आहेत.

जे अजूनही त्यांच्या अजेंड्यानुसार प्रश्न विचारतात आणि अर्थ बदलतात, त्यांनी भगवद्गीतेचा मनापासून अभ्यास करणे आणि स्वीकारणे आवश्यक आहे, तरच भगवद गीता "बुक ऑफ लाइफ अँड वर्क मॅनेजमेंट" प्रत्येकाच्या जीवनात समाविष्ट केली जाईल व समाजात सकारात्मक बदल दिसेल.

पंकज जगन्नाथ जयस्वाल (7875212161)

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande