पुणे - दिवाळीसाठी फटाक्यांना परवानगी मिळण्याची शक्यता
पुणे 26 ऑक्टोबर (हिं.स) - पुणेकर मागील एक-दिड वर्षापासून कोरोना संसर्गाचा सामना करीत आहेत. कोरोनाचे
पुणे - दिवाळीसाठी फटाक्यांना परवानगी मिळण्याची शक्यता


पुणे 26 ऑक्टोबर (हिं.स) - पुणेकर मागील एक-दिड वर्षापासून कोरोना संसर्गाचा सामना करीत आहेत. कोरोनाचे मळभ आता विरळ होण्याची चिन्हे दिसू लागल्याने नागरीकांमध्ये उत्साह संचारला आहे. बाजारपेठेतील गर्दीवरुन ते अधिक अधोरेखीत होत आहे. त्यातच दिवाळीसाठी राज्यात इतर ठिकाणी फटाक्यांना परवानगी मिळाली, परंतु पुण्यात काही हालचाल दिसत नव्हती. मात्र मंगळवारी फटाक्यांबाबत "पॉझिटीव्ह'' निर्णय होण्याची शक्यता असून योग्य निर्बंध घालून फटाक्यांना परवानगी मिळण्याची दाट शक्यता आहे. शहराला मागील एक ते दिड वर्षांपासून कोरोनाचा मोठा फटका बसला. नागरिकांना अनेक सणसमारंभ निर्बंधाखाली साजरे करावे लागत होते. आता मात्र हे चित्र बदलू लागले आहे. काही महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागला आहे. त्यामुळे सर्वच क्षेत्रामध्ये समाधानकारक वातावरण तयार होऊ लागले आहे. त्यातच दिवाळी सण आल्याने नागरीकांचा आनंदही द्विगुणीत झाला आहे. मागील वर्षी दिवाळी साजरी करताना नागरीकांना फटाके उडविण्यावर मर्यादा होत्या. यंदाही असे निर्बंध असणार का ? असा नागरीकांचा प्रश्न होता.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande