ठाणे जिल्ह्यात रात्रीपर्यंत ४२ हजार नागरिकांचे लसीकरण
ठाणे, 26 ऑक्टोबर (हिं.स.) कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत ठाणे जिल्ह्यात कोविन पोर्टलवरील नोंदी
ठाणे जिल्ह्यात रात्रीपर्यंत ४२ हजार नागरिकांचे लसीकरण


ठाणे, 26 ऑक्टोबर (हिं.स.) कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत ठाणे जिल्ह्यात कोविन पोर्टलवरील नोंदीनुसार सोमवारी रात्रीपर्यंत ४२ हजार ४२१ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८० लाख ४९ हजार १९ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून त्यापैकी ५३ लाख ९५ हजार ४०८ नागरिकांना पहिल्या डोसचे तर २६ लाख ५३ हजार ६११ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. आज दिवसभरात लसीकरणाचे सुमारे ४९६ सत्र आयोजित करण्यात आले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande